Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी किरकोळ रक्कम नाही मात्र देशातील...., *“टॉप 10 कंपन्यांकडून...

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी किरकोळ रक्कम नाही मात्र देशातील…., *“टॉप 10 कंपन्यांकडून भारतीय बँकांना सुमारे चार लाख कोटींचा चुना – शेतकरी संघटनेचा गंभीर आरोप”*

 

 

 

*पुणे | मुंबई | दिल्ली. दिनांक: २२ मार्च २०२६.*

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मोठ्या उद्योगपतींकडून जाणीवपूर्वक कर्ज न फेडल्यामुळे (Willful Default) प्रचंड आर्थिक फटका बसत असून, टॉप 10 कॉर्पोरेट कंपन्यांनी मिळून सुमारे ₹4 लाख कोटींचा आर्थिक फसवणुकीचा प्रकार केल्याचा गंभीर आरोप शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम.एस. फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच 25 26 च्या बजेट अधिवेशन संसदेत दिलेल्या माहितीनुसार, चालू दशकात ही विलफुल डिफॉल्टरची संख्या सातत्याने वाढत असून, थकीत कर्जामध्ये मोठी वाढ झाली आहे. ही बाब आरबीआय ने देखील कबूल केली आहे, यामुळे बँकिंग व्यवस्थेवर गंभीर ताण निर्माण झाला असल्याचे संघटनेने नमूद केले.

संघटनेच्या माहितीनुसार, गीतांजली जेम्स, भूषण पॉवर अँड स्टील, HDIL यांसारख्या १० कंपन्यांकडे चार लाख कोटींची थकबाकी आहे. तो पैसा बुडाल्यात जमा मंजे जवळपास राईट ऑफ होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

*⚠️ शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा..*

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी सरकारवर टीका करत म्हटले आहे:

उद्योगपतींना लाखो कोटींची कर्जमाफी दिली जाते

शेतकऱ्यांना मात्र हमीभाव व आर्थिक संरक्षण दिले जात नाही.? ही सा,पत्न वागणूक शेतकऱ्यांप्रती भारत सरकारने का ठेवावी.? यात गेल्या अनेक दशकांपासून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली आहे

*📢 शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या.*

सर्व शेतमालाला कायदेशीर हमीभाव (MSP Guarantee Law)

“राष्ट्रीय व राज्य कृषी किंमत न्यायाधिकरण” आयोग स्थापना

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग, व स्वतंत्र कृषी न्यायालय.

इन्कम सिक्युरिटी (Income Security) लागू करणे

*🚜 देशव्यापी आंदोलनाचा इशारा.*

“सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, देशभरात शेतमाल उत्पादन व विक्री बंद आंदोलन छेडण्यात येईल. भविष्यात शेतकरी कर्जफेड देखील थांबवू शकतात.”

*📅 महत्त्वाचे कार्यक्रम.*

📍 १ व २ मे २०२६ – राळेगणसिद्धी (महाराष्ट्र) येथे सर्व संघटनांच्या वतीने

*➡️ “Income Security First – Farmer Welfare Most” राष्ट्रीय परिषद.*

*📍 १५ व १६ जून २०२६ – दिल्लीत.*

*➡️ राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय शेतकरी अधिवेशन.*

🤝 देशभरातील प्रमुख नेते व प्रतिनिधींचा सहभाग

या आंदोलनासाठी देशभरातील विविध राज्यांतील शेतकरी नेते, सामाजिक कार्यकर्ते व संघटना एकत्र येत असून त्यामध्ये खालील प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे:

*🟢 महाराष्ट्र:-*

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, विक्रमवीर मनोज दादा जरांगे पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व लोकनायक बच्चू कडू, राष्ट्रीय समाज पक्ष- मा. महादेवजी जानकर, किसान सभा डॉ. अशोक ढवळे, माजी खासदार छत्रपती संभाजी राजे, प्रदेशाध्यक्ष प्रशांत टिक्कर स्वाभिमानी संघटनेचे,-राजू शेट्टी कोल्हापूर, किसान ब्रिगेडचे प्रकाशजी पोहरे (अकोला), विश्वासजी उटगी (मुंबई), विठ्ठल राजे पवार राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ भारतीताई चव्हाण राष्ट्रीय उपाध्यक्ष, संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अंबादास कोरडे पाटील., जीडी इनामदार माजी न्यायाधीश प्रदेश कार्याध्यक्ष, दत्ता आवारी राष्ट्रीय समन्वय समिती सदस्य, भारती ताकसांडे प्रदेश उपाध्यक्ष प्रोजेक्ट डायरेक्टर, प्रतिभा पवार पाटील प्रदेश उपाध्यक्ष महिला, एडवोकेट मीना सोनवणे मुंबई विभाग अध्यक्ष लीगल प्रमुख मुंबई विभाग, काशिनाथ जाधव पाटील प्रदेश उपसचिव, श्रीकांत नलावडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, बाळासाहेब वर्पे अनिल भांडवलकर पुणे जिल्हा अध्यक्ष, प्रेमजीतसिंह राजे पवार अध्यक्ष युवक विद्यार्थी कामगार आघाडी, हिरामण बांदल, यशवंत डांगर अध्यक्ष शिरुर लोकसभा. मेजर सुभाष वाळुंज अध्यक्ष नगर-नाशिक विभाग.*फोरम ऑफ इंटेलेक्च्युअल – इंजि. सतीश देशमुख.* राष्ट्रीय राळेगणसिद्धी नेसायच्या अध्यक्षा कल्पना इनामदार, कार्याध्यक्ष अशोक सब्बल, राष्ट्रसेवा दलाचे अल्लाउद्दीन शेख, विविध पक्षांचे पदाधिकारी व नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 

*🟡 इतर राज्ये:-*

कर्नाटक – प्रो. मीनाक्षी पाटील काळे, गोवा -गणपत नायक,

आंध्र प्रदेश – पी. रजनीकांत

तेलंगणा – रामा नायडू

तामिळनाडू – एस. गीता (NUBC National President)

केरळ – रामा लक्ष्मी

मध्य प्रदेश – माजी खासदार बुद्धसेन पटेल, सफल चौधरी

पश्चिम बंगाल – सुब्रतो मोदक, बिपाशा बासू

गुजरात – जयरामराव मराठे, निलीमा देसाई.

राजस्थान – राजपाल मीना

उत्तर प्रदेश – सुषमा बजाज

बिहार – जे.पी. चौधरी, शैलेंद्र सिंह

दिल्ली – आशिष कारखानिस, रवींद्र कुमार

हरियाणा – दारासिंह, विक्रम सिंग वालिया

पंजाब – अ‍ॅड. कमलजीत सिंह राणावत

जम्मू-काश्मीर – (प्रतिनिधी)

छत्तीसगड – पृथ्वीराज जोगी

ओडिशा – सोमय्या राजन

गॅस देशभरातील 200 प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहतील या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे व संघटनेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनायक माजी मंत्री बच्चू कडू तर कार्यक्रमाच्या समारोपाचे अध्यक्ष महादेव जानकर साहेब तर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती यावेळी लागणार असल्याची माहिती विठ्ठल राजे पवार यांनी दिली आहे.

🗣️ अंतिम इशारा

विठ्ठल राजे पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले:

“सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास, देशातील एकही शेतकरी कर्ज फेडणार नाही आणि शेतमाल विकणार नाही. यासाठी संपूर्ण जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असेल.”

माननीय संपादक / पत्रकार बंधू-भगिनींना विनंती:

कृपया सदर बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावी.

*आपला स्नेहांकित किसान सेवक.*

 

 

*विठ्ठल राजे पवार.*

*राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक*

शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार एम.एस. फाउंडेशन, महाराष्ट्र.

संपर्क क्रमांक 7887313311/ ई-मेल ऍड्रेस nvithal.fams@gmail.com sjvmss.vp9@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments