Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुविधा*

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुविधा*

 

 

पुणे, दि. १५ (जिमाका,वृत्तसेवा) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Services (CDS) परीक्षेची पूर्वतयारी करून देण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे CDS कोर्स क्र. ६७ आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण वर्ग १५ जून ते २८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत होणार असून निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी १४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

 

उमेदवारांनी Department Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या संकेतस्थळावरून CDS ६७ कोर्सचे प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पूर्ण भरून दोन प्रतींसह मुलाखतीस यावे. प्रवेशासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक असून त्यांनी UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या CDS परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा.

 

या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी दि. ०९ जून २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे मुलाखतीस उपस्थित राहावे.

 

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.pctcnashik@gmail.com या ईमेलवर किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ तसेच व्हॉट्सअॅप क्रमांक ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments