Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedएकात्मिक पर्यावरण पुनरुज्जीवन उपक्रमाद्वारे हिंदुजा फाउंडेशनने पुणे येथील SRPF संकुलात जलसुरक्षा आणि...

एकात्मिक पर्यावरण पुनरुज्जीवन उपक्रमाद्वारे हिंदुजा फाउंडेशनने पुणे येथील SRPF संकुलात जलसुरक्षा आणि जैवविविधता बळकट केली

 

 

जलपुनर्भरण, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि शहरी भागात वृक्षारोपण यांद्वारे हा प्रकल्प 4,000 हून अधिक SRPF जवान आणि रहिवाशांना लाभ मिळवून देतो.

हिंदुजा फाउंडेशनच्या प्रमुख ‘जल जीवन’ कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

 

पुणे, 5 जून 2026: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हिंदुजा समूहाचे सामाजिक राबवणाऱ्या हिंदुजा फाउंडेशनने, सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड एज्युकेशन (CERE) यांच्यासोबत पुण्यातील रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) गट-1 संकुलामध्ये जल पुनर्भरण, सांडपाणी पुनर्वापर आणि शहरी वनीकरण उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीची घोषणा केली.

 

संकुल परिसरातील जलसुरक्षा, भूजल पुनर्भरण, सांडपाणी व्यवस्थापन आणि जैवविविधतेचे पुनरुज्जीवन बळकट करण्याच्या उद्देशाने, हिंदुजा रिन्युएबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि गल्फ ऑइल ल्युब्रिकंट्स इंडिया लिमिटेड यांच्या सहकार्याने, हिंदुजा फाउंडेशनच्या जल जीवन या प्रमुख कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 4,000 हून अधिक SRPF कर्मचारी आणि रहिवाशांना थेट लाभ मिळत असून, लगतच्या परिसरातील दीर्घकालीन पर्यावरणीय सुरक्षेसाठी देखील याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

 

या उपक्रमावर भाष्य करताना हिंदुजा फाउंडेशनचे सीईओ, रमण कल्याणकृष्णन म्हणाले: “पर्यावरणीय शाश्वतता ही सर्वसमावेशक, सामाजिक सहभागाच्या उपायांद्वारे निर्माण केली पाहिजे, यामुळे दीर्घकालीन परिणाम घडतात, यावर आमचा विश्वास आहे. एसआरपीएफ ग्रुप १ कॅम्पसमधील हा उपक्रम हे सिद्ध करतो की, हवामान बदलांना तोंड देऊ शकणाऱ्या परिसंस्था शहरी वातावरणात निर्माण करण्यासाठी जलसंधारण, सांडपाणी पुनर्वापर आणि जैवविविधता पुनर्संचयन याचा एकत्रितरित्या कसा उपयोग होऊ शकतो. भूजल पुनर्भरण मजबूत करून, सगळीकडे झाडे लावून तसेच पर्यावरणीय पुनर्संचयनाला प्रोत्साहन देऊन, आम्ही केवळ पर्यावरणीय लवचिकताच वाढवत नाही, तर भावी पिढ्यांसाठी अधिक निरोगी आणि शाश्वत समुदायांच्या निर्मितीमध्येही योगदान देत आहोत.”

 

या प्रकल्पाने तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले — पर्जन्यजल संधारण आणि भूजल पुनर्भरण; सांडपाणी पुनर्वापर आणि तलावांचे पुनरुज्जीवन; आणि जैवविविधता बळकट करण्यासाठी शहरी भागात वृक्षारोपण.

 

प्रकल्पातील प्रमुख घटक आणि परिणामांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

पर्यावरणाचे दीर्घकालीन रक्षण करण्यासाठी, कॅम्पसमध्ये एकूण 55 वनस्पती प्रजातींची 2,400 रोपे लावण्यात आली, ज्यात 44 स्थानिक प्रजातींचा समावेश आहे.

कर्मचारी निवासस्थानांमधील 330 घरांसाठी नैसर्गिक सांडपाणी पुनर्वापर प्रणाली विकसित करण्यात आली.

भूजल पुनर्भरण सुधारण्यासाठी 55 पर्जन्यजल वाहिन्या छिद्रित करण्याचे उपाय आणि 13 खोल पुनर्भरण खड्डे बांधण्यात आले.

250 मीटर लांबीच्या नाल्याचे पुनरुज्जीवन करण्यासोबतच 400 चौरस मीटरचे चर विकसित करण्यात आले.

तलावाचे पुनरुज्जीवन आणि नैसर्गिक सांडपाणी प्रक्रियेसाठी 100 चौरस मीटरची तरंगती रीड बेड प्रणाली स्थापित करण्यात आली.

तरंगते एरेटर, व्हॉर्टेक्स मायक्रो-एरेशन प्रणाली आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्प्रवाहासाठी पायाभूत सुविधांचे निर्माण. लागवड केलेली झाडे 100% जगण्याचे उद्दिष्ट साध्य झाले असून, वैज्ञानिक निरीक्षण आणि कार्बन मूल्यांकनासाठी 1,266 रोपांना जिओटॅग करण्यात आले आहे.

 

या उपक्रमामुळे कॅम्पसमधील जैवविविधता वाढण्यासही महत्त्वपूर्ण हातभार लागला आहे. पुनर्संचयित परिसंस्थेत आता पक्ष्यांच्या 31 प्रजाती, कीटकांच्या 15 प्रजाती, फुलपाखरांच्या नऊ प्रजाती, तसेच अनेक सस्तन प्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. या ठिकाणी आढळलेल्या पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रजातींमध्ये इंडियन ग्रे हॉर्नबिल आणि इंडियन पीफॉल यांचा समावेश आहे, तसेच स्थानिक पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत करणाऱ्या महत्त्वाच्या फिकस प्रजातीही येथे आहेत.

 

सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड एज्युकेशन (CERE) च्या संस्थापक आणि संचालक डॉ. रशनेह एन. परडीवाला म्हणाल्या, “साधे निसर्ग-आधारित उपाय शहरी पर्यावरणीय आव्हानांना किती प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात, हे हा प्रकल्प दाखवून देतो. वैज्ञानिक नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीद्वारे, CERE ने जलप्रणाली पुनर्संचयित करणे, जैवविविधता सुधारणे, मातीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सांडपाण्यावर पुनर्वापर करणे आणि एसआरपीएफ कॅम्पसमध्ये झाडे वाढवण्यासाठी काम केले आहे. या उपक्रमाने कॅम्पसमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांसाठी एक आरोग्यदायी आणि अधिक शाश्वत पर्यावरण निर्माण करण्यासोबतच, एसआरपीएफ कॅम्पसच्या आसपासच्या शेतकऱ्यांनाही मदत केली आहे, ज्यांच्या पिकांच्या उत्पादकतेवर जमिनीत सांडपाणी मुरल्यामुळे परिणाम झाला होता.”

 

राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) गट 1 परिसराच्या कमांडंट श्रीमती तेजस्वी सातपुते म्हणाल्या, “पाणी व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रक्रिया यांसारख्या समस्यांचे निराकरण करणाऱ्या या प्रकल्पामुळे SRPF गट 1 परिसरामध्ये लक्षणीय सुधारणा घडून आली आहे. तलावाचे पुनरुज्जीवन आणि वृक्षारोपण या उपक्रमांमुळे परिसरातील पर्यावरणीय व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारली असून, आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि रहिवाशांसाठी अधिक हरित तसेच आरोग्यदायी वाता

वरण निर्माण झाले आहे.”

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments