Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedआहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’  ...

आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’  गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे आवाहन   श्री सरस्वती कराड हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

 

 

पुणे, २५ जून: “उत्तम स्वास्थ्य आणि मनःशांती हवी असेल तर प्रत्येकाने स्वतःला ओळखावे. आपल्या आजाराकडे आपण कसे पाहतो यावर आरोग्य अवलंबून असते. आहार व बोलण्यावर संयम ठेवला तर सर्व काही शक्य होते. श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास यांचा योग्य ताळमेळ बसवून आत्मचिंतनाची गरज आहे,” असे आवाहन सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी केले.

 

माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी मातोश्री स्व. सरस्वती कराड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या श्री सरस्वती कराड रुग्णालयाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त एम आय टी  कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभागृहात ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

 

माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभ आशीर्वादाने हा कार्यक्रम संपन्न झाला.

 

या प्रसंगी सौ. उषा विश्वनाथ कराड, श्री प्रकाश जोशी विश्वस्त, सौ विद्या जोशी  तसेच सह कार्यकारी विश्वस्त डॉ. सुचित्रा कराड-नागरे,  एसएसकेएचचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तुषार खाचणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिरीष भातलवंडे आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अमोल सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. तसेच समाजातील शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, आरोग्य क्षेत्रातील नागरिक तथा हास्य क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “मनःशांती आणि उत्तम आरोग्यासाठी हसणे हे सर्वोत्तम औषध आहे. आपल्या आजाराकडे कसे पाहतो यावर आरोग्य अवलंबून असते. परिस्थिती व व्याधीला विनोदी बुद्धीने स्वीकारण्याची कला शिकावी. शरीराचे मालक बनण्याऐवजी सतत ट्रस्टीची भावना ठेवावी. आरोग्य बिघडण्याचे मुख्य कारण प्रतिक्रिया आणि विचार असतात.”

 

“व्याधी आल्यावर डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवून उपचार करा. स्वतःचे आत्मचिंतन करून आजाराचे कारण शोधावे. भय संपले की जीवनात आनंदाचे अंकुर फुटतात.

 

अहंकार आणि केवळ शाब्दिक ज्ञान जीवनाला रुक्ष करतात. त्यामुळे आयुष्यात ‘सिरियस’ न होता ‘ॲडजस्ट’ करायला शिका, म्हणजेच ‘जस्ट ॲड’ करा. आपल्या आचरणावरच मनःशांती आणि उत्तम आरोग्य अवलंबून असते,” असेही डॉ. संजय उपाध्ये यांनी सांगितले.

 

डॉ. सुचित्रा कराड-नागरे यांनी सांगितले की, “स्वास्थ्य, सेवा आणि सुशिक्षण या तीन तत्त्वांवर आधारित या हॉस्पिटलमध्ये १०० पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्ण सेवा दिली जात आहे. अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा या रुग्णालयात दर्जेदार रुग्ण सेवा देण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत.

 

डॉ. तुषार खाचणे यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध योजना, ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती तसेच तपासण्यांवर दिली जाणारी सूट आणि आरोग्य सुविधांची विस्तृत माहिती दिली.

 

सूत्रसंचालन डॉ. अदिती ताळे यांनी केले.

 

 

जनसंपर्क विभाग,

श्री सरस्वती कराड हॉस्पिटल, पुणे

 

एसएसकेएच कडून सवलत.

प्रथम वर्धापन दिनानिमित्त सीटी स्कॅन, एम आर आय, एक्सरे, mamography व रक्त तपासण्या 50% दरात,  angiography सेवा पॅकेज सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने या वेळी करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments