Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedतिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धा १२ जुलै २०२६ रोजी रंगणार

तिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धा १२ जुलै २०२६ रोजी रंगणार

  • पुणे, ६ जुलै २०२६: पुणे स्थित गोल्डलिफ एंन्टरटेन्मेंटच्या वतीने तिसऱ्या ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेचे १२ जुलै २०२६ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानावर या ठिकाणी होणार आहे. ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन स्पर्धेला बायोफ्युअल सर्कल, रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्ट दापोली, न्याती ग्रुप व उगावो यांनी प्रायोजित केले आहे.

ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनचे आयोजक अथर्व अय्यर म्हणाले की, ‘दुसऱ्या आवृत्तीला पुणेकरांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सलग तिसऱ्या वर्षी अशा प्रकारची इको फ्रेंडली मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. यात प्लॅस्टिक आणि कार्बनचा शून्य वापर केला जाणार आहे.’ जंपस्टार्ट इंटरनॅशनल स्कुल व गोल्डलिफ एंन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते १० वर्षांखालील लहान मुलांच्या हस्ते तळजाई येथे ४ जुलै २०२६ रोजी झाडे लावण्याचा अनोखा उपक्रम देखील या वर्षी राबविण्यात आला आहे. यावेळी बायोफ्युअल सर्कलचे उत्पादन व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक संदीप शेळके, रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्ट दापोलीचे संचालक अनिल छाजेड व रोहन छाजेड, पीएमसीचे माजी नगरसेवक प्रविण चोरबेले, राहुल म्हसवडे, सिद्ध शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

तसेच, विशेष म्हणजे या वर्षी ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन या स्पर्धेत दुसऱ्या वर्षी पावाथॉन या तीन किलोमीटर अंतराच्या विशेष शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत स्पर्धकांना आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांसोबत सहभागी होता येणार आहे. या विशेष शर्यतीमुळे जीवनशैलीमध्ये आरोग्यपूर्ण आणि आरोग्य प्राणी चपळ अशा एका विशेष शैलीचे भर पडणार असून आपल्या प्राण्या प्राण्यांबरोबर त्यांना निकटचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे पुण्यातील निसर्ग सौंदर्याचा आणि पावसाळ्यातील हवामानाचा आपल्या लाडक्या सोबत याबरोबर आनंद घेता येणार आहे, असेही अय्यर म्हणाले.

 

स्पर्धेला स्कुल पार्टनर जंपस्टार्ट इंटरनॅशनल स्कुल, मेडिकल पार्टनर मणिपाल हॉस्पिटल, स्पोर्टींग पार्टनर चॅम्पियन स्पोर्ट्स, फिजिओ पार्टनर लिंकीनमूव्ह्स, रिकव्हरी पार्टनर भारत स्पोर्ट्स इव्होल्यूशन, गिफ्टिंग पार्टनर लॅकोपेरा, पेट गिफ्टिंग पार्टनर द वुफ परेड, न्युट्रीशन पार्टनर हमी गमी, एनर्जी पार्टनर फास्ट एन अप, फूड पार्टनर बदामीकर केटरर्स, प्रोटीन पार्टनर राईटबाईट मॅक्स प्रोटीन, परफॉर्मन्स पार्टनर व्हाम एनर्जी, सस्टेनेबल गिफ्टिंग पार्टनर उगाओ यांचा पाठिंबा लाभला आहे.

 

प्रत्येक धावपटूला एक रोपटे दिले जाणार आहे. शर्यतीच्या मार्गावर पुनर्वापर केलेले पाणी उपलब्ध केले जाईल. शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येकास गुडी बॅग, पदक, नाश्ता, मार्ग सहाय्यक, गिफ्ट व्हाऊचर आणि एक ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 

यातील २१ कि.मी. अंतराची अर्ध मॅरेथॉन सदू शिंदे क्रिकेट मैदानापासून सुरु होऊन तळजाई डोंगर, पद्मावती पार्किंग, ट्रेझर पार्क मार्गे अरण्येश्वर मंदिर, गजानन महाराज चौक मार्गे सदू शिंदे क्रिकेट मैदानावर संपेल. १० कि.मी. अंतराची शर्यत दोन टप्प्यात आणि ५ कि.मी. शर्यत एका टप्प्यात धावेल. स्पर्धेत एकूण ५०,०००रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ८ जुलै २०२६ असणार आहे.

 

ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉनसाठी नावनोंदणी करण्यासाठी https://www.townscript.com/e/green-pune-monsoon-hill-marathon-3-323244 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक चौकशीसाठी आयोजकांशी भ्रमणध्वनी क्रमांक (मोबाईल) मीरा सामंत 7219804030 यांच्याशी संपर्क साधावा.

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments