Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी लॅक्टेशन हेल्पलाइन सुरू

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी लॅक्टेशन हेल्पलाइन सुरू

पुणे,1 ऑगस्ट 2026 : स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्तनपानावेळेस उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर समुपदेशन करण्याच्या हेतूने नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे लॅक्टेशन हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले.याप्रसंगी पीयुएलए पुणे लेडीज च्या संस्थापिका सोनिया अग्रवाल कोंजेटी, नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने,समुह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे, संचालक एच.के साळे, बालरोग विभागाचे संचालक पी. डी पोटे, एनआयसीयूचे प्रमुख डॉ.अभय महिंद्रे,वरिष्ठ लॅक्टेशन सल्लागार डॉ.संगीता खराटे , एनआयसियु मधील वरिष्ठ सल्लागार डॉ.अनिल खामकर, नवजात शिशू तज्ञ, डॉ सुमित भावसार वैद्यकीय सेवा संचालक मनिषा पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

ब्रेस्टफीडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ : स्ट्रेंथन व्हॉट वर्क्स ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.कार्यक्रमात नवजात शिशु तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ,लॅक्टेशन कन्सल्टंटस यांचा सहभाग असलेले संवादात्मक सत्र पार पडले.

 

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर येथील एनआयसीयूचे प्रमुख डॉ.अभय महिंद्रे म्हणाले की,एकीकडे स्तनपानाविषयी जागरूकता वाढत असली तरी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस -6 ) मध्ये पहिल्या सहा महिन्यापर्यंत होणाऱ्या स्तनपानाचे प्रमाण 63.7 टक्क्यांवरून 55.8 टक्क्यांपर्यंत घटले आहे.स्तनपानाच्या बाबतीत नवमातांना अनेक समस्या उद्भवू शकतात,विशेष करून बाळ जन्मल्यानंतर पहिल्या काही दिवसांत याचे निराकरण न केल्यास स्तनपानावरून दुसऱ्या पर्यायांकडे जाण्याची शक्यता असते.मात्र पहिले सहा महिने स्तनपान व बाळाच्या आरोग्यदायी जीवनाचा पाया असतो.त्यामुळे हे स्तनपान मध्ये बंद पडू नये या हेतूने ही लॅक्टेशन हेल्पलाइन उपयुक्त ठरेल.

 

काही भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये बाळाची स्तनपानावेळेस स्तनाची पकड नीट न होणे,टंगटाय सारख्या समस्यांमुळे स्तनपान करण्यास अडचणी अशा अनेक समस्यांचा समावेश असू शकतो.अनेक समस्या या वर्तवणूक आणि चिंतेशी निगडीत असतात.या सर्व समस्यांसाठी लॅक्टेशन हेल्पलाइन उपयुक्त होणार असून त्यानंतर गरज पडल्यास क्लिनिकमध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.

 

डॉ.महिंद्रे म्हणाले की,या लॅक्टेशन हेल्पलाइनला प्रमाणित कौन्सिलर्सचे पाठबळ आहे.सध्या 16 अशा कौन्सिलर्सचा समावेश असून कुठल्याही वेळेस लॅक्टेशन हेल्पलाइनसाठी 3 ते 4 तज्ञ उपलब्ध असतील.

 

डॉ. दिलीप माने म्हणाले की एकत्रित कुटुंबपध्दती नाहिशी होत चालल्याने नवमातांना मार्गदर्शन मिळणे अवघड झाले असून यामुळे लॅक्टेशन कौन्सिलर्स आणि हेल्पलाइनची भूमिका आणखी महत्त्वाची ठरेल.

 

या उपक्रमाविषयी बोलताना नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. दिविज माने म्हणाले, “ स्तनपानासाठीची ही समर्पित हेल्पलाईन असून, नवमातांना योग्य वेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक आधार मिळावा या उद्देशाने ती सुरू करण्यात आली आहे. स्तनपान ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी सुरुवातीच्या काळात अनेक मातांना विविध शंका आणि अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी ही हेल्पलाईन त्यांना योग्य सल्ला, आणि त्वरित मार्गदर्शन उपलब्ध करून देईल.”

 

सोनिया अग्रवाल कोंजेटी म्हणाल्या, स्तनपान ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. या विषयावर काहीही प्रश्न असतील तर महिलांनी ते त्याबाबत डॉक्टरांकडून मार्गदर्शन घ्यावे जेणेकरून मुलांचे संगोपन व्यवस्थित होईल.

 

यावेळी उपस्थित मातांच्या प्रश्नांना डॉ . संगीता खराटे, डॉ.संतोष सिदीद, डॉ.अभय महिंद्रे डॉ.अनल खामकर, डॉ सुमित भावसार यांनी उत्तरे देत मार्गदर्शन केले. तसेच हेलपलाईन सांभाळणाऱ्या पारिचारिकांचा सन्मान करण्यात आला.

 

समाजातील काही गैरसमज आणि मिथके स्तनपानाच्या मार्गातील अडचण ठरू शकतात.त्यामुळे मातांसह कुटुंबातील सदस्यांमध्येही योग्य व पुराव्याआधारित माहितीच्या आधारे जनजागृती होणे महत्त्वाचे

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments