Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026' जिल्ह्यात 50 हजार 448...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026′ जिल्ह्यात 50 हजार 448 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

पुणे, दि. 6 : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’ अंतर्गत पुणे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत 64 हजार 655 लाभार्थ्यांपैकी 50 हजार 448 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. 14 हजार 207 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित असून संबंधितांनी ते तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय प्रगतीनुसार हवेली तालुक्यात 1,351 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून 1,002 प्रकरणे प्रलंबित आहेत. भोर तालुक्यात 2,308 पूर्ण व 1,515 प्रलंबित, मुळशी तालुक्यात 573 पूर्ण व 142 प्रलंबित, मावळ तालुक्यात 1,352 पूर्ण व 985 प्रलंबित, खेड तालुक्यात 2,208 पूर्ण व 1,094 प्रलंबित, शिरूर तालुक्यात 4,729 पूर्ण व 730 प्रलंबित, आंबेगाव तालुक्यात 1,351 पूर्ण व 227 प्रलंबित, इंदापूर तालुक्यात 9,231 पूर्ण व 1,831 प्रलंबित, वेल्हा तालुक्यात 429 पूर्ण व 405 प्रलंबित, जुन्नर तालुक्यात 2,155 पूर्ण व 825 प्रलंबित, बारामती तालुक्यात 8, 578 पूर्ण व 939 प्रलंबित, पुरंदर तालुक्यात 3,143 पूर्ण व 782 प्रलंबित आणि दौंड तालुक्यात 10, 653 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून 1,883 प्रकरणे प्रलंबित आहेत. राष्ट्रीयकृत व इतर बॅंका मध्ये 2,397 पूर्ण तर 1,847 प्रलंबित आहेत.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप झालेले नाही, त्यांनी संबंधित बँक, सेवा केंद्र किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून त्वरित आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments