Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedलठ्ठपणावर मात करण्यासाठी बहुआयामी प्रयत्नांची गरज · नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड...

लठ्ठपणावर मात करण्यासाठी बहुआयामी प्रयत्नांची गरज · नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे आयोजित ओबेसिटी मास्टर क्लासमध्ये तज्ञांचे मत

पुणे,6 ऑगस्ट 2026 : लठ्ठपणाला जगभरात अधिकृतरित्या एक आजार आणि प्रमुख सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.लठ्ठपणावर मात करण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोनाची गरज असल्याचे मत विविध तज्ञांनी व्यक्त केले.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे नुकतेच पुण्यातील शेरटन ग्रँड हॉटेल येथे द ओबेसिटी मास्टरक्लास (360°) -डीॲन्डओ कॉन स्पेशल एडिशन 2026 ही दोन दिवसीय वैद्यकीय परिषद पार पडली. स्थूलपणा (ओबेसिटी) व्यवस्थापन आणि मेटाबोलिक मेडिसिनमधील अत्याधुनिक संशोधन व उपचारपध्दती याबाबत चर्चा करण्यासाठी या परिषदेला भारतासह विविध देशांतील आघाडीचे एंडोक्रिनोलॉजिस्ट, फिजिशियन, बॅरिएट्रिक सर्जन, आहारतज्ञ, संशोधक आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञ यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 75 आंतरराष्ट्रीय तज्ञांसह 500 हून अधिक डॉक्टर्स उपस्थित होते.

या परिषदेत लठ्ठपणाचा प्रतिबंध, निदान आणि दीर्घकालीन उपचारांसाठी बहुशाखीय आणि रूग्णकेंद्रित दृष्टीकोनावर विशेष भर देण्यात आला. परिषदेपूर्वी वैयक्तिक गरजांनुसार आहार नियोजन, शारीरिक हालचाल, वर्तनातील बदल आणि शाश्वत वजन व्यवस्थापन या विषयांवरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यानंतर भारत,डेन्मार्क,जपान आणि युनायटेड किंगडम मधील तज्ञांनी विविध सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. लठ्ठपणावरील औषधोपचार, बालवयातील लठ्ठपणा, मेटाबॉलिक शस्त्रक्रिया आणि उपचारातील नव्याने विकसित होत असलेल्या पध्दतींवर सखोल चर्चा करण्यात आली.

परिषदेत प्रख्यात तज्ज्ञ डॉ. बंशी साबू आणि डॉ.ब्रिजमोहन मक्कर यांचे बीजभाषण झाले. विविध सत्रांमध्ये लठ्ठपणामुळे हृदयरोग, फॅटी लिव्हर डिसीज, महिलांचे आरोग्य, झोपेचे विकार, मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह आणि एकूणच चयापचय आरोग्याशी असलेली जोखीम यावर चर्चा करण्यात आली. बॉडी कॉम्पोझिशन ॲनालिसिस, इन्सुलिन पंप तंत्रज्ञान आणि कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग (सीजीएम) यावरील प्रात्यक्षिक कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये प्रतिनिधींनी सहभाग घेतला.

या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने, उपव्यवस्थाकीय संचालक डॉ.दिविज माने, समूह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे,सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ओबेसिटी, मेटाबॉलिक डिसीजेस अँड ॲडव्हान्स्ड बॅरिएट्रिक सायन्सेसच्या प्रोग्राम डायरेक्टर व आयोजन समितीच्या प्रमुख डॉ.रीमा काशिवा आणि बॅरिएट्रिक सर्जन डॉ. परमेश्वर बंबरुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थाकीय संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,लठ्ठपणाला आता एक आजार म्हणून अधिकृतरित्या ओळखले जाऊ लागले असून त्यासाठी पुराव्यावर आधारित उपचार पध्दती,सहयोग आणि रूग्णांना निरंतर सेवा या सर्व गोष्टींची गरज आहे.ओबेसिटी मास्टर क्लासमुळे या विषयाबाबत ज्ञान,जागतिक पातळीवरच्या सर्वोत्कृष्ट पध्दतींबाबत देवाण-घेवाण शक्य झाली असूद यामुळे रूग्ण परिणामांमध्ये सुधार होण्यास मदत होईल.

डॉ.संजय पठारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments