बॅटरी अॅज अ सर्व्हिस (बीएएएस) या पर्यायाची सुरुवात : नवीन ‘बीई 6 स्पोर्टिक्यू’ मालिकेची प्रारंभिक किंमत ११.४५ लाख रुपये आहे. बीएएएस पर्यायांतर्गत बॅटरी वापरासाठी प्रति किमी ३.७५ रुपयांचा दर लागू असेल.
डिजिटल कॉकपिट आणि टेक् सुइट्स : संपूर्ण डॅशबोर्डवर पसरलेला आधुनिक तीन स्क्रीनचा डिजिटल कॉकपिट आणि सहा नवीन ‘टेक् सुइट्स’ देण्यात आल्या आहेत. यामध्ये गूगल जेमिनीवर आधारित ‘टेक्_टॉक’ या पुढील पिढीच्या संवादात्मक सहाय्यकाचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवास अधिक कनेक्टेड, सहज आणि सोयीस्कर बनतो.
बीई 6 स्पोर्टिक्यू लाँच एडिशन : या आवृत्तीत नवीन ग्रॅफाइट स्टॉर्म बाह्य रंगसंगती आणि संपूर्ण रेसिंग टॅन लेदरेट इंटिरिअर देण्यात आले आहे.
बीई 6 स्पोर्टिक्यू फॉर्म्युला ई फ्रीडम एडिशन : ‘बीई 6 स्पोर्टिक्यू’ मालिकेची ही अधिक स्पोर्टी आवृत्ती आहे. यामध्ये दोन स्क्रीन असलेले रेसिंग वाहनांपासून प्रेरित मूळ कॉकपिट आणि ‘महिंद्रा’च्या फॉर्म्युला ई प्रवासाचे प्रतीक असलेले वैशिष्ट्यपूर्ण हॅलो डिझाइन देण्यात आले आहे.
सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेईकल (एसडीव्ही) क्षमता : बीई 6 स्पोर्टिक्यू मालिकेत सादर करण्यात आलेली वैशिष्ट्ये जानेवारी २०२७ पासून टप्प्याटप्प्याने विद्यमान ‘बीई 6’, ‘एक्सईव्ही 9ई’ आणि ‘एक्सईव्ही 9एस’ यांच्या ग्राहकांनाही सॉफ्टवेअर अपडेट्सद्वारे उपलब्ध करून दिली जातील.
डिलिव्हरीची सुरुवात : ओणमच्या शुभ मुहूर्तावर, दि. २६ ऑगस्ट २०२६ पासून वाहनांच्या डिलिव्हरीला प्रारंभ होईल.
मुंबई, १५ ऑगस्ट २०२६ : ‘महिंद्रा’ने आज ‘बीई 6 स्पोर्टिक्यू’ ही नवी मालिका सादर केली. ‘महिंद्रा’च्या लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व करणारी ही मालिका आहे. ‘बीई 6’ची स्पोर्टी ओळख आणि प्रगत तंत्रज्ञान कायम ठेवत, या नव्या मालिकेत ग्राहकांना निवडीसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘बीई 6 स्पोर्टिक्यू’ मालिकेच्या अनावरणासोबतच ‘महिंद्रा’ने स्पोर्टिक्यू संकल्पनेच्या आणखी दोन विशेष आवृत्त्याही सादर केल्या. यामध्ये सर्वाधिक वैशिष्ट्यांनी सज्ज अशी ‘लाँच एडिशन’ आणि उच्च कामगिरीवर भर देणारी ‘फॉर्म्युला ई फ्रीडम एडिशन’ यांचा समावेश आहे.
नोव्हेंबर २०२४मध्ये बाजारात आल्यानंतर ‘बीई 6’ने ग्राहकांचे आणि वाहनप्रेमींचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ‘महिंद्रा’च्या इलेक्ट्रिक एसयूव्हींपैकी सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या वाहनांपैकी ते एक ठरले आहे. ‘बीई 6’ हे केवळ वाहन म्हणून नव्हे, तर ग्राहकांशी भावनिक नाते निर्माण करणारा अनुभव देण्यासाठी ओळखले जाते. या भावनेचे प्रतिबिंब “पल्स गोज रोग” (वेगळी वाट निवडणारा) या जाहिरातीच्या संकल्पनेत दिसून येते. ‘बीई 6’ ज्या विचारातून विकसित करण्यात आली, त्याच विचाराला पुढे नेण्याचे काम ही संकल्पना करते.
‘बीई 6 स्पोर्टिक्यू’ : डिझाइन, तंत्रज्ञान आणि अनुभवाची नवी ओळख
स्पोर्टिक्यू ही स्वतंत्र मालिका म्हणून विकसित करण्यात आली आहे. यामध्ये डिझाइन, तंत्रज्ञान आणि वापराच्या अनुभवाशी संबंधित अनेक नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत.
ही मालिका १२ आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. त्यामध्ये रोसो इम्पुल्सो, रुबी व्हेल्वेट, ग्रॅफाइट स्टॉर्म आणि फायरस्टॉर्म ऑरेंज सॅटिन या ४ नव्या रंगांचाही समावेश आहे. वन, टू, थ्री, थ्री+, फोर, एफई, एफई फोर आणि लॉन्च एडिशन अशा आठ प्रकारांमध्ये ही मालिका उपलब्ध होणार आहे. कामगिरी, तंत्रज्ञान आणि मालकीचा अनुभव यांबाबत ग्राहकांना अधिक पर्याय मिळावेत, या उद्देशाने तिची रचना करण्यात आली आहे.
‘टू’ आणि त्यावरील सर्व प्रकारांमध्ये संपूर्ण डॅशबोर्डवर पसरलेली तीन स्क्रीनची डिस्प्ले प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे अधिक आधुनिक आणि आकर्षक कॉकपिटचा अनुभव मिळतो. दोन स्क्रीन असलेले, रेसिंग वाहनांपासून प्रेरित असे मूळ कॉकपिट आणि वैशिष्ट्यपूर्ण हॅलो डिझाइन या गोष्टी पसंत करणारे ग्राहक ‘स्पोर्टिक्यू फ्रीडम एडिशन’ निवडू शकतात.
स्पोर्टिक्यू मालिकेतील प्रत्येक प्रकारात तंत्रज्ञानाने समृद्ध आणि या श्रेणीत प्रथमच देण्यात आलेली अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे ‘बीई 6 ईएसयूव्ही’ची ‘सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेईकल’ (एसडीव्ही) ही मूलभूत संकल्पना कायम राखली गेली आहे.
स्पोर्टिक्यू मालिकेत सादर करण्यात आलेली सर्व नवीन तंत्रज्ञानाची आणि सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये विद्यमान ‘बीई 6’, ‘एक्सईव्ही 9ई’ आणि ‘एक्सईव्ही 9एस’ ग्राहकांनाही उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी जानेवारी २०२७पासून टप्प्याटप्प्याने ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपडेट्स जारी केले जातील. मात्र, ग्राहकांना उपलब्ध होणारी वैशिष्ट्ये त्यांच्या वाहनाच्या मॉडेल आणि प्रकारानुसार वेगवेगळी असतील.
एमएआयए आणि सहा टेक् सुइट्स
एमएआयए (महिंद्रा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्किटेक्चर) हा ‘महिंद्रा’च्या सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेईकल (एसडीव्ही) या संकल्पनेचा पाया आहे. याच तंत्रज्ञानावर आधारित सहा टेक् सुइट्स विकसित करण्यात आल्या आहेत. यामुळे वाहन अधिक सहज वापरता येणारे, आकर्षक, सुरक्षित आणि ग्राहकांच्या गरजांनुसार प्रतिसाद देणारे बनते.
टेक्_टॉक
गूगल जेमिनीवर आधारित असलेले टेक्_टॉक हे पुढील पिढीचे संवादात्मक सहाय्यक सॉफ्टवेअर आहे. प्रत्येक प्रवास अधिक सोपा, कनेक्टेड आणि सहज बनवण्यासाठी ते विकसित करण्यात आले आहे. १७ विशेष एआय एजंट्सच्या मदतीने ते नैसर्गिक पद्धतीने संवाद साधते. यामध्ये १०० हून अधिक मुख्य कार्ये आणि ४८ अॅप्स यांची मदत मिळते. त्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे :
वाहनाचे नियंत्रण
नेव्हिगेशन
संगीत
बातम्या
टेक्_प्ले
टेक्_प्ले विविध परस्परसंवादी मनोरंजन सुविधा उपलब्ध करून देते. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :
कराओके – भारतातील कोणत्याही वाहन उत्पादकाकडून प्रथमच ही सुविधा मिळत आहे.
वाहनातील गेमिंग सुइट तसेच बीवायओडी मोड – भारतातील कोणत्याही वाहन उत्पादकाकडून प्रथमच ही सुविधा.
प्रायव्हेट ऑडिओ
डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी अॅटमॉस
ग्रूव्हमी पार्टी
माइलस्टोन
टेक्_ड्राईव्ह
टेक्_ड्राईव्ह ही सुविधा बुद्धिमान स्वरुपाच्या वाहन नियंत्रण सुविधांच्या मदतीने वाहन चालवण्याचा अनुभव आणि कामगिरी अधिक चांगली बनवते. यामध्ये पुढील सुविधा आहेत :
कस्टम ड्राइव्ह मोड
ड्रिफ्ट मोड
ट्राइब ड्राइव्ह
रिव्हाइव्ह आणि रिव्हाइव्ह एसओएस
‘फॉर्म्युला ई फ्रीडम एडिशन’साठी विशेष अॅक्सेलरेशन बूस्ट
टेक्_मी
टेक्_मी ही सुविधा आपल्या वैयक्तिक पसंतीनुसार वाहन वापरण्याचा अनुभव अधिक सोयीस्कर बनवते. यामध्ये,
स्वयंचलित ओळखीसह युजर प्रोफाइलचा समावेश आहे.
टेक्_सिक्युअर
टेक्_सिक्युअर ही सुविधा बुद्धिमान स्वरुपाच्या देखरेख सुविधांद्वारे सुरक्षितता वाढवते. त्यामध्ये पुढील सुविधा आहेत :
‘सिक्युअर३६० प्रो’ – यातून थेट दृश्य, ऑडिओ रिले आणि अनधिकृत प्रवेशाची सूचना या गोष्टी मिळतात.
एनएफसी आणि ‘डिजिटल कार की’ – आयफोन, अॅपल वॉच, अॅंड्रॉईड आणि सॅमसंग स्मार्टफोन, तसेच ‘एनएफसी की कार्ड्स’ यांना अनुरूप ठरेल अशी सुरक्षित स्वरुपाची ‘डिजिटल कार की’ सुविधा. विविध उपकरणांच्या प्रणालींमध्ये कार कनेक्टिव्हिटी कन्सॉर्टियम (सीसीसी) या मानकांनुसार डिजिटल कार कीची सुविधा देणारी महिंद्रा ही पहिली भारतीय वाहन उत्पादक कंपनी ठरली आहे.
तिसऱ्या स्क्रीनसाठी पॅरेंटल लॉक
टेक एक्स-टिंग
‘टेक्_एक्स-टिंग’मुळे ग्राहकांना अधिक वैयक्तिक अनुभव मिळतो.
यामध्ये ‘टेलगेट’वर स्वतःच्या पसंतीचा संदेश प्रदर्शित करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
बीई 6 स्पोर्टिक्यू लाँच एडिशन
बीई 6 स्पोर्टिक्यू लाँच एडिशन ही या मालिकेतील सर्वात उच्च श्रेणीतील आवृत्ती आहे. यामध्ये खास ग्रॅफाइट स्टॉर्म बाह्य रंगसंगती आणि संपूर्ण रेसिंग टॅन लेदरेट इंटिरिअर देण्यात आले आहे. त्यामुळे या आवृत्तीला वेगळी ओळख मिळते.
‘बीई 6 स्पोर्टिक्यू फॉर्म्युला ई फ्रीडम एडिशन’
‘बीई 6 स्पोर्टिक्यू फॉर्म्युला ई फ्रीडम एडिशन’ ही ‘बीई 6’ची सर्वाधिक दमदार कामगिरी देणारी आवृत्ती आहे. ‘महिंद्रा रेसिंग’च्या ‘फॉर्म्युला ई’ उपक्रमातून प्रेरणा घेत, इलेक्ट्रिक मोटरस्पोर्टचा उत्साह आणि अनुभव या विशेष आवृत्तीत साकारण्यात आला आहे.
याचे महत्त्व यासाठीही विशेष आहे की, अलीकडील काळात ‘महिंद्रा रेसिंग’ने ‘फॉर्म्युला ई’ स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मोनॅको आणि टोकियो येथील विजय, एदोआर्दो मोर्तारा यांनी मिळवलेल्या विक्रमी चार पोल पोझिशन्स, यांतून ‘महिंद्रा रेसिंग’ने जागतिक इलेक्ट्रिक रेसिंग क्षेत्रातील आपली क्षमता पुन्हा अधोरेखित केली आहे.
ही कामगिरी आणखी ठळकपणे ‘लंडन ई-प्रिक्स’ स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. तेथे ‘फ्रीडम लिव्हरी’ आणि ‘स्पोर्टिक्यू फ्रीडम एडिशन’ एकत्र सादर करण्यात येणार आहेत.
‘स्पोर्टिक्यू फ्रीडम एडिशन’मध्ये मूळ ‘बीई 6’चे हेडलॅम्प डिझाइन कायम ठेवण्यात आले आहे. त्यासोबतच बाह्य रचनेत तिरंग्याच्या सौम्य रंगछटा वापरण्यात आल्या आहेत. त्या रेसिंग प्रेरणेचे प्रतीक आहेत. या आवृत्तीचा स्पोर्टी स्वभाव अधिक उठून दिसावा यासाठी ती नवीन ‘रोसो इम्पल्सो’सह विविध आकर्षक सॅटिन रंगांमध्ये उपलब्ध असेल. आतील भागात ब्लॅक आणि फायरस्टॉर्म ऑरेंज ही खास रंगसंगती देण्यात आली आहे. यासोबत दोन स्क्रीन असलेले डिजिटल कॉकपिट आणि या आवृत्तीसाठी खास हॅलो डिझाइन समाविष्ट करण्यात आले आहे.
अधिक रोमांचक ड्रायव्हिंगचा अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी ‘स्पोर्टिक्यू फ्रीडम एडिशन’मध्ये अॅक्सेलरेशन बूस्ट सुविधा देण्यात आली आहे. यामुळे वाहन शून्य ते शंभर किमी प्रतितास हा वेग केवळ ६.४४ सेकंदांत गाठू शकते. त्यामुळे वाहनाची कामगिरी आणि ड्रायव्हिंग यांचा आनंद अधिक वाढतो.
‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ऑटोमोटिव्ह व्यवसायाचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. वेलुसामी आर. म्हणाले, “इलेक्ट्रिक मोबिलिटी आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. ग्राहक आता इलेक्ट्रिक वाहनाचे मूल्यांकन केवळ त्याची रेंज किंवा वेगवाढीची क्षमता पाहून करत नाहीत. त्यांना वाहन अधिक बुद्धिमान, अधिक वैयक्तिक आणि वापराच्या संपूर्ण कालावधीत अधिक उपयुक्त असावे अशी अपेक्षा असते. स्पोर्टिक्यू ही त्याच बदलाचे प्रतीक आहे. एमएआयए तंत्रज्ञानावर आधारित ही मालिका कृत्रिम बुद्धिमत्ता, वैयक्तिक अनुभव, कामगिरी आणि मनोरंजन यांचा संगम घडवते. त्यामुळे प्रत्येक प्रवास अधिक सहज आणि आनंददायी बनतो. ‘बीई 6’ हे सॉफ्टवेअर डिफाइन्ड वाहन असल्यामुळे ग्राहकांना वाहन मिळाल्यानंतरही त्यामध्ये सातत्याने सुधारणा आणि नवीन सुविधा जोडता येतात. भविष्यात अशी वाहने अधिक महत्त्वाची ठरतील जी त्यांच्या मालकांसोबत विकसित होत राहतील. स्पोर्टिक्यू ही त्याच विचारातून तयार करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक एसयूव्हीकडून ग्राहकांच्या अपेक्षा सातत्याने विस्तारत राहाव्यात, असा मालकीचा अनुभव देण्याचा तिचा उद्देश आहे.”
‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ऑटो आणि फार्म क्षेत्राचे मुख्य डिझाइन व क्रिएटिव्ह अधिकारी प्रताप बोस म्हणाले, “महिंद्रामध्ये डिझाइन म्हणजे केवळ बाह्य रूप नसते. उत्पादन कसे दिसते किंवा कसे वाटते यापलीकडे जाऊन ग्राहक त्याचा अनुभव कसा घेतात, याचाही त्यात समावेश असतो. ‘बीई 6 स्पोर्टिक्यू’सारख्या सॉफ्टवेअर डिफाइन्ड वाहनासाठी हे विशेष महत्त्वाचे आहे. वाहनातील प्रत्येक पृष्ठभाग, प्रत्येक डिस्प्ले आणि प्रत्येक संवाद ग्राहकाच्या अनुभवाला आकार देतो. स्पोर्टिक्यू विकसित करताना आम्ही वाहनाच्या आतील भागातही बाह्य रचनेसारखाच आकर्षक अनुभव निर्माण करण्यावर भर दिला. नवीन रेसिंग टॅन इंटिरिअर, संपूर्ण डॅशबोर्डवर पसरलेला तीन स्क्रीनचा डिस्प्ले आणि वापरलेली प्रत्येक सामग्री यांचा विचारपूर्वक समन्वय साधण्यात आला. त्यामुळे आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि स्पष्टपणे ‘बीई 6’ची ओळख जपणारा अनुभव मिळतो. प्रगत तंत्रज्ञानाचा आनंद देतानाच चालकाशी भावनिक नातेही कायम ठेवते, असे हे गाडीतील वातावरण आहे.”
‘महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड’च्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे कार्यकारी संचालक नलिनीकांत गोल्लागुंटा म्हणाले, “बीई 6 ही सुरुवातीपासूनच आकर्षक रचना, स्पोर्टी स्वभाव आणि वेगळा विचार करण्याच्या धाडसासाठी ओळखली जाते. स्पोर्टिक्यू ही त्याच पायावर उभी राहून कामगिरीवर आधारित अनुभव आणि बुद्धिमान तंत्रज्ञान यांचा मेळ घालते. त्यामुळे ‘बीई 6’च्या प्रवासातील एक नवा अध्याय सुरू होत आहे. अधिकाधिक ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञान आणि दैनंदिन वापरातील उत्साहवर्धक अनुभव उपलब्ध करून देणे, हा स्पोर्टिक्यू आणण्यामागील मुख्य विचार आहे.”
किंमती आणि उपलब्धता
‘बीई 6 स्पोर्टिक्यू’च्या विविध प्रकारांच्या एक्स-शोरूम किंमती* (लाख रुपयांत)
प्रकार / बॅटरी
५९ केडब्ल्यूएच (बीएएएस) #
५९ केडब्ल्यूएच
७० केडब्ल्यूएच
७९ केडब्ल्यूएच
वन
₹ ११.४५
₹ १९.४५
–
–
टू
₹ १२.९५
₹ २०.९५
–
–
थ्री
–
₹ २१.९५
₹ २२.९५
–
थ्री+
–
–
₹ २३.९५
₹ २४.९५
फोर
–
–
–
₹ २६.९५
लॉन्च एडिशन
–
–
–
₹ २६.९५
एफई
–
–
–
₹ २४.४५
एफई फोर
–
–
–
₹ २६.९५
* या किंमतींमध्ये वॉल चार्जर आणि त्याच्या बसवण्याचा खर्च समाविष्ट नाही.
# बीएएएस या पर्यायात बॅटरीचा वापर प्रति किमी ₹ ३.७५ या दराने गृहीत धरला असून, दररोज ६० किमी वापराचा आधार घेतला आहे.
ओणमच्या शुभ मुहूर्तावर, दि. २६ ऑगस्ट २०२६ पासून वाहनांच्या डिलिव्हरीला सुरुवात होणार आहे.
महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्ही – सोशल मीडिया हँडल्स
ब्रँड संकेतस्थळ : mahindraelectricsuv.com
इन्स्टाग्राम : @mahindraelectricsuvs
एक्स : @mahindraeSUVs
यूट्यूब : @mahindraelectricsuvs
फेसबुक : @mahindraelectricoriginsuvs
हॅशटॅग्स :
#बीई6स्पोर्टिक्यू #MahindraElectricOriginSUVs #PulseGoesRogue


