नवी दिल्ली,19th ऑगस्ट २०२६: फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) ने जेईई (JEE) आणि नीट (NEET) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने त्यांचा वार्षिक शिष्यवृत्ती उपक्रम फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप कम अॅडमिशन टेस्ट (पीडब्ल्यूएनएसएटी) २०२६ च्या चौथ्या एडिशनची घोषणा केली आहे. नोंदणी मोफत असून इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थी, तसेच १२ वी उत्तीर्ण झालेले पीसीएम आणि पीसीबी शाखांचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात.
या वर्षाच्या एडिशनद्वारे, पात्र विद्यार्थी १०० टक्के ट्यूशन फी माफीपर्यंत शिष्यवृत्ती मिळवू शकतात आणि २.५ कोटी रुपयांपर्यंत रोख पारितोषिके जिंकू शकतात. याव्यतिरिक्त, हा शिष्यवृत्ती उपक्रम अव्वल ५०० पात्र विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि हॉस्टेलची सुविधा देखील उपलब्ध करून देईल.
पीडब्ल्यूएनएसएटी २०२६ जास्त प्रमाणात सहभाग शक्य व्हावा यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांमध्ये आयोजित केली जाईल. ऑनलाइन परीक्षेचा पर्याय निवडणारे विद्यार्थी १ ते १५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान परीक्षा देऊ शकतात, तर ऑफलाइन परीक्षा ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी देशभरातील पीडब्ल्यू विद्यापीठ, पाठशाळा आणि ट्युशन सेंटर्सवर घेतली जाईल. निकाल नंतरच्या तारखेला जाहीर केले जातील.
अलख पांडे, एज्युकेटर, संस्थापक आणि सीईओ, फिजिक्सवाला म्हणाले, “दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असू नये. पीडब्ल्यूएनएसएटीच्या माध्यमातून, ही आव्हाने कमी करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन प्रदान करणे, ज्यामुळे ते आत्मविश्वासाने आपली तयारी सुरू ठेवू शकतील, हे आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही आशा करतो की, देशभरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आर्थिक अडचणींना अडथळा न बनवता आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी या उपक्रमामुळे प्रोत्साहन मिळेल.”
या उपक्रमाचा भाग म्हणून, पीडब्ल्यूएनएसएटी २०२६ मधील कामगिरीच्या आधारे निवडक विद्यार्थ्यांना जेईई आणि नीटच्या तयारीसाठी एक्स्क्लूसिव्ह रँकर्स ग्रुपद्वारे अतिरिक्त शैक्षणिक मार्गदर्शन आणि मेंटॉरशिप मिळेल.
***
पीडब्ल्यूएनएसएटी २०२६: अव्वल ५०० पात्र जेईई/नीट (JEE/NEET) इच्छुकांसाठी मोफत शिक्षण आणि निवास सोय आणि २.५ कोटी रुपयांपर्यंत रोख पारितोषिके जिंकण्याची संधी इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोंदणी आता सुरू आहे
RELATED ARTICLES


