Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांसाठी उत्पन्न निकषात शिथिलता; मागील दोन वर्षांतील...

*पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या घरांसाठी उत्पन्न निकषात शिथिलता; मागील दोन वर्षांतील कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य*

 

 

 

पुणे, दि.२ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत १५ टक्के सामाजिक व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांच्या अडचणींचा विचार करून मागील दोन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

यासंदर्भातील जाहिरात २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात झाली. अर्जदारांच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून तहसीलदार कार्यालयाकडून प्राप्त उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र ऑनलाइन पद्धतीने सादर करणे बंधनकारक आहे.

 

मंडळामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ या कालावधीतील उत्पन्नाचा दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करण्याबाबत अर्जदारांना जाहिरातीद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, अनेक अर्जदारांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे आयकर विवरणपत्र सादर केले असले तरी ते अलीकडील कालावधीतील असल्याने आयकर विभागाकडून त्याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपलब्ध होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अर्ज भरताना अर्जदारांना अडचणी येत होत्या.

या पार्श्वभूमीवर अर्जदारांची अडचण लक्षात घेऊन आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ यापैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्जदारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments