पुणे, दि. २ : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शनिवार दि. ५ व रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सुट्टीच्या दिवशी दिवे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे. स्कूल बस, व्हॅन चालक व वाहनमालकांनी आपल्या वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांनी केले आहे.
स्कूल बस चालक व मालकांनी आपल्या वाहनांसह दिवे कार्यालय येथे उपस्थित राहून वाहनांची तपासणी करून घ्यावी. योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणा साठी स्कूल बस वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित वाहनमालकांनी निर्धारित दिवशी वाहनांसह उपस्थित राहून आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी.
पुणे जिल्ह्यातील स्कूल बस चालक, मालक तसेच संबंधित संघटनांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने वाहनांची आवश्यक तपासणी व प्रमाणपत्र नूतनीकरण करून घ्यावे, असेही परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे.
००००


