Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedकैवल्याचं चांदणं *‘कैवल्याचं चांदणं’ला रसिकांची उत्स्फूर्त दाद* ...

कैवल्याचं चांदणं *‘कैवल्याचं चांदणं’ला रसिकांची उत्स्फूर्त दाद* नाट्यसंगीताच्या समृद्ध परंपरेचा देखणा आविष्कार

 

 

पुणे, दि. ६ सप्टेंबर :

मराठी नाट्यसंगीताच्या समृद्ध परंपरेचा परिचय करून देणाऱ्या ‘शब्द, पुणे’ निर्मित ‘कैवल्याचं चांदणं’ या दोन अंकी संगीत नाटकाचा प्रयोग रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ५ ते ७.३० या वेळेत ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड, पुणे येथे उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाला. या प्रयोगाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

*विशेष म्हणजे हा कार्यक्रम नूमवि शाळेच्या SSC १९७६ बॅच च्या सुवर्ण महोत्सवी वर्ष समारंभाचा एक खास भाग होता*

नाट्यसंगीताच्या बहारदार आविष्काराने रंगलेला हा प्रयोग रसिकांसाठी श्रवणीय आणि दृक्श्राव्य आनंदाची पर्वणी ठरला.

एका प्राध्यापकाने म्हणलं की, “तुम्ही संगीत नाटकांची परंपरा एका अभिनव पद्धतीने पुढे चालू ठेवताय.. हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या आणि सहजतेने पेललं आहे… !”

दुसरी एक वैद्यकीय अभ्यास करणारी विद्यार्थिनी म्हणाली, “आम्हां तरुण पिढीला हा आपला एवढा जबरदस्त वारसा आहे ह्याची कधी जाणीवही नव्हती…!!”

याशिवाय “नाट्यसंगीताचा बहारदार अनुभव”, “अवघा रंग एक झाला”, “जणू चांदणंच अवतरलं आणि कैवल्याचा अनुभव आला” अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केल्या.

 

कलाकारांचा अभिनय, दोन्ही गायकांची अप्रतिम गायकी, संगीतसाथ, वेशभूषा, मेकअप, ड्रेपरी आणि नेपथ्य यांचे रसिकांनी विशेष कौतुक केले. संपूर्ण सांघिक सादरीकरणाने प्रयोगातील भावविश्व अधिक खुलवले.

रंगमंचावरील या सादरीकरणामागे अनेक दिवसांचे नियोजन, असंख्य तासांचा सराव आणि कलाकारांसह पडद्यामागील तंत्रज्ञ व सहकाऱ्यांची अथक मेहनत होती. प्रत्येक विभागाच्या समन्वयातून प्रयोगाला एकसंध आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले.

मराठी संगीत नाटकाची समृद्ध आणि अभिजात परंपरा आजच्या रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘कैवल्याचं चांदणं’ सादर करण्यात आले आहे. पारंपरिक नाट्यसंगीताचा आत्मा जपत केलेली रंगमंचीय मांडणी आणि कलाकारांच्या सादरीकरणाला मिळालेली रसिकांची दाद, हे या प्रयोगाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.

रसिकांच्या मनात नाट्यसंगीताची ही अनुभूती रुजवता आली, हाच या प्रयोगाचा खरा आनंद असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

 

प्रमुख श्रेय:

*संकल्पना, लेखन व दिग्दर्शन :* मिलिंद कुलकर्णी

*संगीत संयोजन :* उदय सुभेदार

*प्रशासन व व्यवस्थापन :* संजय संती

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments