पुणे दि. ९ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिरेगाव येथे जागतिक अंडी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पोषणविषयक जनजागृती उपक्रम घेण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनय कुमार पानसरे यांनी अंड्यांमधील प्रथिने, जीवनसत्त्वे, त्यांचे आरोग्यविषयक फायदे आणि संतुलित आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच अंड्यांविषयीचे गैरसमज दूर करून कुक्कुटपालन व्यवसायाची माहिती देण्यात आली.
या उपक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी संदीप सरक, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत शिंदे, ग्राम महसूल अधिकारी जयश्री सुतार, सौरभ भागवत, विनायक जगताप उपस्थित होते.
मुख्याध्यापिका शोभा गायकवाड, उपशिक्षिका प्रमिला साळुंखे आणि प्रियंका भापकर यांनी सहभाग घेतला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सकस आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले.


