पुणे, दि. २८ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे MH61 संकेतांकांतर्गत दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी विहित शुल्कासह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खाजगी चारचाकी वाहनांसाठी अर्ज २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारले जातील. लिलावाचे डीडी ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३.१५ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. लिलाव त्याच दिवशी दुपारी ४ वाजता होईल.
दुचाकी वाहनांसाठी अर्ज ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० या वेळेत स्वीकारले जातील. लिलावाचे डीडी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजेपर्यंत स्वीकारले जातील. लिलाव त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहात होईल.
अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डची साक्षांकित प्रत आणि विहित शुल्काचा डीडी जोडणे आवश्यक आहे. डीडी ‘R.T.O., Pune’ या नावाने पुण्यातील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असावा. पुणे आरटीओच्या कार्यक्षेत्रातील पत्ता असलेल्या वाहनधारकांचेच अर्ज स्वीकारले जातील.
पसंतीच्या क्रमांकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सुधारित शुल्क लागू राहील. लिलावानंतर शिल्लक क्रमांक https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. लिलावात क्रमांक न मिळालेल्या अर्जदारांनी मूळ डीडी पाच दिवसांच्या आत कार्यालयातून परत घ्यावा, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी कळविले आहे.
000


