Wednesday, October 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये दुचाकींसाठी नवीन NW मालिका* *आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित...

पिंपरी-चिंचवड आरटीओमध्ये दुचाकींसाठी नवीन NW मालिका* *आकर्षक व पसंतीचे क्रमांक आरक्षित करण्यासाठी ३० ऑक्टोबरला अर्ज करण्याचे आवाहन*

 

 

 

पुणे, दि. २८ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी लवकरच NW ही नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरून आरक्षित करण्यासाठी इच्छुकांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत विहित नमुन्यात अर्ज करावेत.

 

 

दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक क्रमांकांसाठी २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. चारचाकी वाहनांसाठीची अर्जदारांची यादी २ नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांसाठीची यादी ३ नोव्हेंबर रोजी कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. अधिक रकमेची बोली लावण्यासाठी संबंधितांनी अनुक्रमे २ व ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात डिमांड ड्राफ्ट जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता बोली प्रक्रिया पार पडेल.

 

 

अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, फोटो ओळखपत्र व पॅनकार्ड यांच्या साक्षांकित प्रती आणि आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. डिमांड ड्राफ्ट ‘DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे पुणे येथील राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असावा.

 

 

आरक्षित नोंदणी क्रमांक बदलता येणार नाही. क्रमांक आरक्षित केल्यापासून १८० दिवसांत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास आरक्षण रद्द होईल व भरलेले शुल्क शासन जमा होईल. आरक्षणासाठी भरलेले शुल्क परत मिळणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments