Friday, November 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिशन लक्षवेध अंतर्गत खेळाडूंची २७ व २८ नोव्हेंबर रोजी निवड चाचणी*

मिशन लक्षवेध अंतर्गत खेळाडूंची २७ व २८ नोव्हेंबर रोजी निवड चाचणी*

 

 

पुणे, दि.२०: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यामार्फत ॲथलेटिक्स क्रीडा प्रकाराच्या राज्यस्तरावर हायपरफॉर्मन्स सेंटर मध्ये राज्यातील खेळाडूंची निवड करण्यासाठी दिनांक २७ व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी ॲथलेटिक ट्रॅक, शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे पुणे येथे निवड चाचणी होणार आहे.

 

या निवड चाचणीसाठी खेळाडूचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. निवड चाचणीसाठी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहणे आवश्यक असून २८ नोव्हेंबर रोजी शारीरिक क्षमता चाचणी व वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण, क्रीडा वैद्यकाशास्त्राचे सहकार्य, परदेशी प्रशिक्षण, उत्तम दर्जाची निवास व भोजन व्यवस्था, पूरक आहार, स्पर्धा सहभागासाठी आर्थिक सहाय्य या बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

निवड चाचणी मध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी https://forms.gle/fRhwYkKECBxoSC4k8 या गुगल शीट मध्ये भरावी व अधिक माहितीसाठी www.sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. निवड चाचणीच्या आणि कशासाठी प्रशांत यमकर यांच्याशी ९५४५७३२९८३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहसंचालक संजय सबनीस यांनी केले आहे.

 

००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments