Friday, November 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedनागरी संरक्षण दलामार्फत बुधवारी अग्निशमन मॉकड्रिल*

नागरी संरक्षण दलामार्फत बुधवारी अग्निशमन मॉकड्रिल*

 

 

पुणे, दि. २०: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत चालविण्यात येणारी सरकारी संघटना नागरी संरक्षण दलामार्फत बुधवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता हरी गंगा को. हाउसिंग सोसायटी, आळंदी रोड, येरवडा, पुणे येथे १ तासाचे अग्निशमन मॉकड्रिल घेण्यात येणार आहे, असे नागरी संरक्षण दलाचे सहायक उपनियंत्रक अ. रा. कुऱ्हाडे यांनी कळविले आहे.

 

नैसर्गिक व कृत्रिम आपत्ती दरम्यान नागरिकांचे जीवित हानी व वित्तहानी यांचे तीव्रता कमी करणे, सामान्य नागरिकांचे आपत्कालीन परिस्थितीमध्ये दुर्घटने दरम्यान मनोबल उंचावणे, दैनंदिन जीवन सुरळीत करणे यासारखे कामे स्वयंसेवकाद्वारे नागरी संरक्षण दलामार्फत केली जातात.तसेच जखमी नागरिकांना प्रथमोपचार देणे, आगीपासून बचाव करणे याबाबत सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती उपक्रम निशुल्क राबविले जातात.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments