Friday, November 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंजीव सोशल फाउंडेशनतर्फे२६/११ च्या शहिदांना व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली शहिदांच्या प्रतिमांना...

संजीव सोशल फाउंडेशनतर्फे२६/११ च्या शहिदांना व मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली शहिदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण

पुणे : संजीव सोशल फाउंडेशन व फाउंडेशनच्या संस्थापिका छाया संजीव गदादे यांच्या वतीने मांजरी ग्रीनवुड्स येथे मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अठराव्या स्मृतिदिनी श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हल्ल्यात शहीद झालेले पोलीस व सुरक्षा दलांचे जवान आणि प्राण गमावलेले निरपराध नागरिक यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने एकत्र आले.

 

यावेळी शिवाजी माळी, सूरज साळुंके, महादेव थोरात, राजाराम नेवसे, चंद्रकांत नाईक, प्रल्हाद हिंगमिरे, डॉ. संतराम धोत्रे, आबासाहेब भापकर, संजय मगर, जान्हवी तायडे, सार्थक खांडके, आणि शेफाली श्रीवास्तव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी शहिदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी मेणबत्त्या प्रज्वलित केल्या आणि सायंकाळी साडेसात वाजता दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. हल्ल्यात आपले जिवलग गमावलेल्या कुटुंबीयांप्रती यावेळी सहवेदना व्यक्त करण्यात आली.

 

याप्रसंगी संजीव सोशल फाउंडेशनचे डॉ. संकेत गदादे यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील शहिदांच्या शौर्यकथांना उजाळा दिला. संकटात सापडलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून दाखवलेल्या धैर्याचे स्मरण त्यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments