Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक मधमाशा पालन दिनानिमित्ताने पुण्यात २५ जून रोजी मधुमित्र व मधुसखी...

जागतिक मधमाशा पालन दिनानिमित्ताने पुण्यात २५ जून रोजी मधुमित्र व मधुसखी पुरस्काराचे वितरण*

*

पुणे, दि. २१ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने सन २०२३-२४ या वर्षातील ‘मधुमित्र’ व ‘मधुसखी’ पुरस्कार घोषित केले असून जागतिक मधमाशा पालन दिनाचे औचित्य साधून या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन २५ जून रोजी सकाळी ११ वाजता पुण्यातील साखर संकुल सभागृह येथे करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालय, महाबळेश्वर येथील कार्यालयाच्यावतीने २०२३ पासून ‘मधुमित्र पुरस्कार योजना’ सुरू करण्यात आली आहे. मधमाशा पालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी व शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त आहे. मधमाशांची भुमिका महत्वाची असल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे हा पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे.

या आर्थिक वर्षातील प्रथम मधुमित्र पुरस्कार राजू भाऊसाहेब कानवडे मु.पो. अंबड ता.अकोले जि. अहमदनगर, द्वितीय मधुमित्र पुरस्कार दत्तू नारायण खेरगुडे मु.पो.पिर्ली ता. भद्रवती, जि. चंद्रपुर तर तृतीय मधुसखी पुरस्कार कु. योगिता प्रभाकर इंगळे मु.पो.माकेंडा ता.दर्यापुर जि. अमरावती यांना घोषित झाले आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, आमदार सिद्धार्थ शिरोळे व मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आर. विमला यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मधमाशा पालन क्षेत्रात काम करणाऱ्या व मधमाशा पालन विषयात आवड असणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतिश खरात यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments