Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedॲमवे इंडियाने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन : चांगल्या भविष्यासाठी आरोग्यकारक सवयींना...

ॲमवे इंडियाने साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिन : चांगल्या भविष्यासाठी आरोग्यकारक सवयींना प्रोत्साहन देत आहे

21 जून 2024, दिल्ली – ॲमवे इंडिया आरोग्य व कल्याण यांच्या गरजा पूर्ण करणारी अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे आणि तिने आरोग्यकारक आयुष्यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या दृढ समर्पणात योग व पोषण यांना सुलभरीत्या एकत्र केले आहे. तसे करून सर्वांगीण आरोग्याच्या अत्यंत महत्वावर भर दिला आहे आणि आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहे. सकाळच्या दिनचर्येत योग आणि जाणीवपूर्वक पदार्थांचे सेवन सामील करणे हे या उपक्रमाचे उद्देश्य होते. त्याद्वारे उर्वरित दिवसासाठी सकारात्मक कार्यक्षमतेची तयारी करण्यास मदत करते आणि शारीरिक व मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, ॲमवे इंडियाने तज्ञ वक्त्यांच्या कार्यक्रमांसह शारीरिक व आभासी योग सत्रांची मालिका आयोजित केली आणि देशभरातील 4000 हून अधिक स्वास्थ्य प्रेमींपर्यंत पोहोच वाढवली आहे.

या प्रसंगी बोलताना ॲमवे इंडियाचे पूर्व व पश्चिम विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्र चक्रवर्ती म्हणाले, “सर्वांगीण आरोग्य व कल्याण यांस जाहीरपणे पाठिंबा देत आम्ही एकंदर कल्याणावर भर देऊन जागतिक स्तरावर योगचा प्रसार करण्याच्या भारत सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहोत. योग आणि आहार, विशेषत: दिवसाचे पहिले अन्न यांच्यातील परस्परसंबंध भारतातील योग साधकांवरील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. 65% लोकांनी योग सुरू केल्यानंतर आपल्या आहारात विशिष्ट पदार्थ किंवा पेयांचा समावेश केला आहे, असे अभ्यासात आढळून आलेले आहे. याव्यतिरिक्त, 72.4% लोकांनी नमूद केले आहे की, योगमुळे त्यांच्या पहिले अन्न खाण्यावच्या वेळेवर परिणाम झाला असून 63% लोकांनी लवकर खाण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच, आपल्या शरीराच्या नैसर्गिक क्रियांशी योगाभ्यास व पौष्टिक अन्नाचे सेवन एकत्र करून आपण आपल्या आरोग्याला व चैतन्याला अनुकूल करू शकतो, असे आम्ही मानतो. ॲमवे मध्ये, आम्ही व्यायाम, सकारात्मक दृष्टिकोन, विश्रांती आणि पोषण या आमच्या तत्त्वज्ञानाद्वारे या दृष्टिकोनास पाठिंबा देत आहोत आणि पहिले अन्न व योगसारख्या व्यायामासाठी शिस्तबद्ध दृष्टिकोनास पाठबळ देत आहोत. त्याचसोबत संपूर्ण आरोग्य आणि कल्याण वाढविण्यात पोषण संबंधी कमतरता दूर करण्यासाठी आवश्यकतेवर आधारित पूरक आहार घेण्यावर आमचा भर आहे. या सर्व आरोग्यकारक सवयी स्वीकारणे आयुष्य बदलण्याच्या आपल्या ध्येयाशी सुसंगत आहे आणि आरोग्याचा कालावधी वाढविण्यास मदत करते व आरोग्यकारक भविष्यास प्रोत्साहन देत आहे.

पश्चिम प्रदेशात उत्साहपूर्ण भौतिक व आभासी घटनांच्या मालिका आयोजित करण्यात आल्या होत्या. यांच्यात समाजाशी सखोल संबंध वाढविण्याचे उद्दिष्ट असलेली बलवर्धक योग सत्रे आणि माहितीपूर्ण कार्यक्रमयांचा समावेश होता. योगच्या फायद्यांचा प्रचार करणे आणि दिवसाची सुरुवात पौष्टिक अन्नाने करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हे देखील त्यांचे उद्दीष्ट आहे. प्रत्येक सत्रानंतर, सहभागींनी न्यूट्रिलाईट ऑल प्लांट प्रोटीन आणि न्यूट्रिलाईट फायबरने समृद्ध आरोग्यकारक शेक किंवा स्मूदीचा आनंद उचलत दिवसाची सुरुवात केली आणि योगच्या फायद्यांमध्ये भर घातली. याव्यतिरिक्त, सहभागींना गुंतवून ठेवण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी डिजिटल सप्तयोग आणि फिटनेस चॅलेंजेस आयोजित करण्यात आले होते.

ॲमवे खबरदारी पूर्वक आरोग्यावर भर वाढवत आहे आणि व्यक्तींना त्यांच्या आरोग्यावर व कल्याणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सक्षम करण्यास समर्पित आहे. ॲमवेला जवळजवळ 90 वर्षांचा वारसा लाभलेला आहे आणि तिचे न्यूट्रिलाईट जगातील #1 विकले जाणारा व्हिटॅमिन आणि आहार पूरक ब्रँड आहे. ती आहार पूरकतेसाठी वनस्पतीवर आधारित दृष्टिकोनास समर्थन देते. ॲमवेद्वारे न्यूट्रिलाईट व्यक्तींना त्यांची आरोग्य व स्वास्थ्य संबंधी उद्दीष्टे साध्य करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या नवकल्पक दृष्टिकोनातून आणि सर्वांगीण कल्याणासाठी अढळ बांधिलकी यांच्याद्वारे, ॲमवे प्रत्येक व्यक्तीला दररोज आरोग्यकारक प्रारंभाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रोत्साहन देत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments