Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedडीईएसच्या शाळांमध्ये योग दिन साजरा*

डीईएसच्या शाळांमध्ये योग दिन साजरा*

*

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) शाळांमध्ये जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रमेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. योग मार्गदर्शिका वैद्य विभावरी सरदेशमुख यांनी योग साधनेचे महत्त्व सांगितले. शालाप्रमुख मनिषा मिनोचा यांनी प्रास्ताविक केले.

डीईएस प्री-प्रायमरी मुरलीधर लोहिया मातृ मंदिर शाळेत पितृदिन ही साजरा केला गेला. पालक आणि विद्यार्थ्यांनी तळजाई टेकडीवर योगासनांची प्रात्यक्षिके व निसर्ग भ्रमण केले आणि वडाचे झाड लावले. मुख्याध्यापिका सौ माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला.

माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात योगशिक्षक जगदीश वाघ यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकातून त्याचे महत्त्व पटवून दिले. योगासनांमुळे आनंदी आणि निरोगी आयुष्य लाभते असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला. मुख्याध्यापिका वासंती बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक सुभाष निंबाळकर आणि प्रिया जोशी यांनी संयोजन केले.

अहिल्यादेवी प्रशालेत दंड स्वरूपातील आसने विद्यार्थिनींकडून करून घेण्यात आली. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. योग शिक्षिका निरजा चोपडा, मधुरा हसबनीस, मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments