Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedइयत्ता पहिली ते चौथी आंतरराष्ट्रीय योग दिन अहवाल

इयत्ता पहिली ते चौथी आंतरराष्ट्रीय योग दिन अहवाल

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे पर्यावरणाचा बिघडत असलेला समतोल आणि आरोग्याचा खालावलेला दर्जा सुधारण्यासाठी योग साधना हाच उत्तम मार्ग.
योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी २१जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने शाळेची माजी विद्यार्थिनी योग अभ्यासक व योग प्रशिक्षक मा.धनश्री जोशी व त्यांची सहकारी मा.मधुरा हसबनीस यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात वरदाताई पटवर्धन यांनी ईशस्तवनाने केली. सुंदर अशा ईशस्तवनानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री प्रसाद लागू सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. प्रास्ताविक सादर करत असताना त्यांनी योग दिन साजरा करण्यामागील संकल्पना व देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचे यामागील योगदान याबद्दल मुलांना माहिती दिली.
यानंतर राजश्रीताई औटी यांनी प्रमुख पाहुण्या व त्यांच्या सहकारी यांचा परिचय करून दिला. प्रशालेच्या वतीने त्यांना तुळशीचे रोप भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर प्रमुख पाहुण्या मा. धनश्रीताई जोशी यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुलांना योग म्हणजे काय? योगाभ्यास म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?हे मुलांना समजेल अशा साध्या, सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच त्यांच्या सहकारी मा. मधुरा हसबनीस ताई यांनी योग नमस्काराचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्याचवेळी धनश्रीताईंनी योग नमस्कार करत असताना घ्यावयाची काळजी,कशाप्रकारे कृती कराव्यात,श्वास कसे घ्यावेत व सोडावेत याबद्दल मार्गदर्शन केले. मुलांकडूनही योग नमस्कार करून घेतला.
व रोज मुलांनी दहा मिनिटे स्वतःसाठी काढून हा योग नमस्कार करावा यासाठी प्रवृत्त केले.
यानंतर स्मिता नाईकडे ताई यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता ताई निकंबे यांनी केले.
अशाप्रकारे योग दिनाचा हा कार्यक्रम उत्साहामध्ये पार पडला.
*आंतरराष्ट्रीय योग दिन*
२१ जून २०२४
माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयामध्ये शुक्रवार दिनांक २१ जून २०२४ रोजी सकाळी साडेसात वाजता न्यू इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री. प्रीतम जोशी यांच्या उपस्थितीत योगदिन साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात नेहाताईंनी योगाचे महत्त्व सांगणाऱ्या ईशस्तवनातून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री. प्रसाद लागू सर यांनी केले.मानवी जीवनातील योगाचे महत्त्व लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील योग दिन साजरा केला जातो. जगाला ही योगाचे महत्त्व पटलेले आहे. म्हणून अनेक देशात साजरा केला जातो. असे ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे मा. प्रीतम जोशी सर यांचा परिचय विकास दिग्रसकर यांनी करून दिला.
त्यानंतर प्रमुख पाहुणे मा.श्री प्रीतम जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना मानवी जीवनामध्ये योगाचे महत्त्व काय आहे हे अत्यंत सोप्या भाषेत समजून सांगितले. आपले शरीर स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला ज्याप्रमाणे शारीरिक योग साधावा लागतो त्याचप्रमाणे मन प्रसन्न राहण्यासाठी सुद्धा योगाची आवश्यकता आहे हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ओंकार म्हणून घेतला. जपप्रणायामाचे महत्त्व सांगत जपप्रणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतले. मन प्रसन्न राहण्यासाठी रोज ध्यान करायला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.
यानंतर शाळेतील शिक्षिका मिताली पिंपळे यांनी आजचे दिनविशेष सांगितले. श्री.केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृतीदिन तसेच वटपौर्णिमेविषयी त्यांनी माहिती सांगितली. आंतरराष्ट्रीय योग दिन आणि जागतिक संगीत दिन याबद्दलही त्यांनी माहिती सांगितली.
यानंतर शिक्षिका स्वाती राजगुरू यांनी विद्यार्थ्यांकडून विविध आसने करून घेतली. उष्ट्रासन,भुजंगासन, पश्चिमोत्तानासन,पद्मासन अशी विविध आसने तसेच छोटे छोटे व्यायाम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सादर केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी नेहा जोशी यांनी केले. सूत्रसंचालन विकास दिग्रसकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, काका, मावशी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम उत्तम होण्यासाठी शाळेचे मा. मुख्याध्यापक श्री प्रसाद लागू सर यांनी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments