पुणे,9 सप्टेंबर 2024 : मोबिलिटीचे भवितव्य अधोरेखित करणाऱ्या एका लक्षणीय कामगिरीसह ऑटोकार इंडिया आणि मर्सिडीझ बेंझ इंडियाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. बंगळुरू ते नवी मुंबई या 949 किमी प्रवास सिंगल चार्ज मध्ये मर्सिडीझ ईक्युएस 580 सह सर्वांत लांबचा प्रवास करत हा विक्रम प्रस्थापित केला आहे.याआधीचा विक्रम फोर्ड मुस्टँग मॅक ई ने युके मध्ये 916.74 किमी केलेल्या प्रवासाचा आहे.हा विक्रम प्रस्थापित करताना हायवेवर जास्तीत जास्त रेंज मिळावी यासाठी 50 ते 60 किमी ताशी चा वेग राखण्यात आला.


