Tuesday, September 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedआकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार सादर

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार सादर

गुरूग्राम, सप्‍टेंबर ९, २०२४: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)ने आज आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार सादर केली. ग्राहकांच्या प्रवास अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जात ६ व ७ सीटर प्रीमियम एसयूव्‍ही तिची भव्‍यता, आरामदायीपणा व सोयीसुविधा, तंत्रज्ञान, उत्‍साही कार्यक्षमता आणि प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह त्‍यांचा प्रवास अधिक सुखकर करेल.

 

लाँचप्रसंगी मत व्‍यक्‍त करत ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालीक श्री. उन्‍सू किम म्‍हणाले, ”ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्‍ये आम्‍ही आमच्‍या विविध व वैविध्‍यपूर्ण उत्‍पादनांच्‍या माध्‍यमातून ग्राहकांना उत्‍साहपूर्ण अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. तसेच, आम्‍ही ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजा जाणून घेण्‍याप्रती समर्पित आहोत, त्‍यांच्‍या अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी सतत विकास करत आहोत. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमधून ही कटिबद्धता दिसून येते. आम्‍हाला इंटेलिजण्‍ट, व्‍हर्साटाइल व इण्‍टेन्‍स एसयूव्‍ही लाँच करण्‍याचा आनंद होत आहे, जी एसयूव्‍ही श्रेणीमधील भव्‍यता, आरामदायीपणा व सोयीसुविधेमध्‍ये अधिक सुधारणा करेल. आम्‍हाला विश्‍वास आहे की, ही एसयूव्‍ही आमच्‍या ग्राहकांना अद्वितीय मूल्‍य तत्त्व देईल.”

 

नवीन ह्युंदाई अल्‍काझार १.५ लिटर टर्बो पेट्रोल एक्झिक्युटिव्ह एमटी (75) व्हेरियंटची सुरुवातीची किंमत रुपये 14,99,000 आणि १.५ लिटर डिझेल एक्झिक्युटिव्ह एमटी (75) व्हेरियंटची सुरुवातीची किंमत रुपये 15,99,000 आहे.

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार – इंटेलिजण्‍ट, व्‍हर्साटाइल, इण्‍टेन्‍स.

 

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ग्राहकांना अपवादात्‍मक गतीशीलता अनुभव देण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारसाठी टॅगलाइन ‘इंटेलिजण्‍ट. व्‍हर्साटाइल. इण्‍टेन्‍स’मध्‍ये एसयूव्‍हीची खासियत सामावलेली आहे.

 

Ø इंटेलिजण्‍ट – एसयूव्‍हीमध्‍ये प्रगतीशील आधुनिक तंत्रज्ञान व कनेक्‍टीव्‍ही वैशिष्‍ट्ये दिसून येतात.

 

Ø व्‍हर्साटाइल – एैसपैस जागा, सीटिंग आणि सहजपणे विविध प्रदेशांमध्‍ये हाताळणी करण्‍याच्‍या क्षमतेसंदर्भात एसयूव्‍हीच्‍या व्‍यापक कार्यक्षमतेला सादर करते.

 

Ø इण्‍टेन्‍स – एसयूव्‍हीचा आकर्षक स्‍टान्‍स दिसून येतो, जो या वेईकलला इतरांपेक्षा वरचढ ठरवतो आणि रस्‍त्‍यावर विशिष्‍ट उपस्थिती देतो.

 

आकर्षक डिझाइन

 

ह्युंदाईच्‍या सेन्‍सुअस स्‍पोर्टीनेसच्‍या ग्‍लोबल डिझाइन ओळखीवर डिझाइन करण्‍यात आलेली आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार भारतातील रस्‍त्‍यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेण्‍यास सज्‍ज आहे. बारकाईने निर्माण करण्‍यात आलेल्‍या एसयूव्‍हीमध्‍ये एैसपैस जागा, मोठे व उंच स्‍टान्‍स आहे, जे रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेतात. नवीन एच शेप्‍ड एलईडी डीआरएल, विशिष्‍ट क्‍वॉड-बीम एलईडी हेडलॅम्‍प्‍स, नवीन हूड डिझाइन, शक्तिशाली फ्रण्‍ट बम्‍परसह नवीन स्किड प्‍लेट आणि नवीन डार्क क्रोम फ्रण्‍ट ग्रिल अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेली प्रीमियम ६ व ७ सीटर एसयूव्‍ही निश्चितच रस्‍त्‍यावर सर्वांचे लक्ष वेधून घेईल.

 

एसयूव्‍हीच्‍या लुकमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करत नवीन आर१८ (व्‍यास = ४६२ मिमी) डायमंड कट अलॉई व्‍हील डिझाइनसह ब्‍लॅक पेंटेड क्‍लॅडिंग आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारला डायनॅमिक प्रोफाइल देतात. अद्वितीय ब्रिज टाइप रेल रूफ, तसेच मोठी, उंच व आधुनिक रिअर डिझाइन एसयूव्‍हीला अधिक सुधारित स्‍टान्‍स देतात.

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारच्‍या फ्रण्‍ट डिझाइनला पूरक रिअर डिझाइनमध्‍ये नवीन स्‍पॉयलरसह एकीकृत स्‍टॉप लॅम्‍प, नवीन बम्‍पर व स्किड प्‍लेट डिझाइन, नवीन कनेक्‍टेड एलईडी टेललॅम्‍प्‍स आहेत, जे मोठ्या, उंच व भावी लुकला अधिक आकर्षक करतात. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये आता नवीन एलईडी टर्न सिग्‍नलसह सीक्‍वेन्शियल फंक्‍शन देखील आहे, जे एसयूव्‍हीच्‍या एकूण आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करतात.

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार एक्‍स्‍टीरिअर आकारमान:

 

लांबी x रूंदी x उंची

 

४५६० X १८०० X १७१० मिमी (रूफ रेल्‍ससह)

 

व्‍हीलबेस

 

२७६० मिमी

 

 

 

अद्वितीय आरामदायीपणा व सोयीसुविधा

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारच्‍या इंटीरिअरमध्‍ये प्रीमियमनेस व आरामदायीपणा सामावलेला आहे. ड्युअल-टोन नोबल ब्राऊन आणि हेझ नेव्‍ही कलर प्‍लश इंटीरिअर्स केबिनमध्‍ये अत्‍याधुनिक फील देते, ज्‍यामुळे तुम्‍हाला घरामध्‍ये असल्‍यासारखे वाटते. एकूण इंटीरिअर डिझाइन लेआऊट एैसपैस जागा, आरामदायीपणा व आधुनिकता देते.

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारच्‍या ६-सीटर व्‍हेरिएण्‍टमधील दुसऱ्या रांगेमध्‍ये व्‍हेण्टिलेटेड कॅप्‍टन सीट्ससह सुधारित कूशनिंग व बॉल्‍स्‍टरिंग आहे. फोल्डिंग आर्मरेस्‍ट असलेल्‍या कॅप्‍टन सीट्स तिसऱ्या रांगेमध्‍ये सहजपणे मोकळी जागा निर्माण होण्‍याची खात्री देतात. ७-सीटर व्‍हेरिएण्‍टमध्‍ये तिसऱ्या रांगेत सुलभ इनग्रेस/ईग्रेससाठी सीट टम्‍बल यंत्रणा आहे. प्रीमियम एयूव्‍हीमध्‍ये अद्वितीय थाय कूशन एक्‍स्‍टेंशन, पहिल्‍या व दुसऱ्या रांगेत व्हेण्टिलेटेड सीट्स, पॉवर वॉक-इन डिवाईस, विंग टाइप हेडरेस्‍ट, ड्रायव्‍हर पॉवर सीट मेमरी फंक्‍शन, ८-वे पॉवर ड्रायव्‍हर आणि ८ वे पॉवर पॅसेंजर सीट अशी इतर अनेक सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामधून लांबच्‍या प्रवासादरम्‍यान अधिक आरामदायीपणा व सोयीसुविधेची खात्री मिळते. अनेक आरामदायी व सोईस्‍कर वैशिष्‍ट्ये असलेली आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार प्रत्‍येक ड्राइव्‍हला संस्‍मरणीय करते.

 

प्रगतीशील तंत्रज्ञान

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये प्रगतीशील तंत्रज्ञान आहे. ऑटोमोटिव्‍ह सोयीसुविधा व स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटीला नव्‍या उंचीवर घेऊन जात आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, जी या आकर्षक एसयूव्‍हीला प्रतिस्‍पर्धींपेक्षा वरचढ ठरवतात.

 

इंटेलिजण्‍ट तंत्रज्ञान व कनेक्‍टीव्‍हटीशी संलग्‍न असलेल्‍या आधुनिकतेची पॅरागॉन आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार पुढील सुविधा देते:

 

Ø डिजिटल कीसह एनएफसी (नवीन)

 

ग्राहकांच्‍या सोयीसुविधेला नव्‍या उंचीवर घेऊन जात आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार एनएफसी तंत्रज्ञानासह नाविन्‍यपूर्ण डिजिटल की असलेली पहिली एचएमआयएल वेईकल आहे. डोअर हँडलच्‍या तुलनेत स्‍मार्टफोन किंवा स्‍मार्टवॉचला स्‍पर्श करत ग्राहक आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारला सहजपणे लॉक व अनलॉक करू शकतात. वेईकल सुरू करण्‍यासाठी युजरला फ्रण्‍ट वायरलेस चार्जर पॅडवर स्‍मार्टफोन/स्‍मार्टवॉच ठेवण्‍याची गरज आहे. हे तंत्रज्ञान ग्राहकाला डिजिटल की एकाच वेळी जवळपास ३ वेगळ्या युजर्ससोबत किंवा जवळपास ७ लिंक केलेल्‍या डिवाईसेससोबत ड्राइव्‍ह व शेअर करण्‍याची सुविधा देते.

 

 

 

Ø सुधारित कनेक्‍टीव्‍हीटी

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये ७० हून अधिक ब्‍लूलिंक कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्यांसह उत्तम सोयीसुविधेसाठी स्‍मार्टवॉच व स्‍मार्टफोन कनेक्‍टीव्‍हीटी आहे. प्रीमियम एसयूव्‍हीमध्‍ये २७० हून अधिक एम्‍बेडेड व्‍हीआर कमांड्स देखील आहेत, ज्‍यामुळे हिंग्लिश व १३५ हिंदी वॉईस कमांड्ससह युजरच्‍या विविध गरजांची पूर्तता होते आणि प्रवास अधिक सुखकर होतो. ग्राहक अनुभवामध्‍ये अधिक वाढ करत आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये निसर्गाचे १० अॅम्बियण्‍ट साऊंड्स आहेत: लाइव्‍हली फॉरेस्‍ट, ऑन ए सेलिंग शिप, सिटी अॅट डॉन, आऊटर स्‍पेस कम्‍युनिकेशन, रेनी डे, मोमेण्‍ट ऑफ मेडिटेशन, हार्बिन्‍जर्स ऑफ स्प्रिंग, ए समर नाइट्स रेस्‍ट, ऑटम सेन्टिमेंट्स, वॉर्म्‍थ इन विंटर.

 

 

 

Ø सर्वोत्तम मनोरंजन

 

एसयूव्‍हीमध्‍ये विनासायास एकीकृत २६.०३ सेमी (१०.२५ इंच) एचडी इन्‍फोटेन्‍मेंट आणि २६.०३ सेमी (१०.२५ इंच) डिजिटल क्‍लस्‍टर आहे, जे एकूण ड्रायव्हिंग अनुभवाला अधिक उत्‍साहित करतात. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार सर्वोत्तम म्‍युझिक अनुभवासाठी इन-बिल्‍ट म्‍युझिक स्‍ट्रीमिंग अॅप्‍लीकेशन जिओसावन (एक वर्षाच्‍या पूरक सबस्क्रिप्‍शनसह)सह मधुरमय मनोरंनजाचा आनंद देखील देते. इन-बिल्‍ट नेव्हिगेशनसोबत बहुभाषिक यूआय डिस्‍प्‍लेसह (१० प्रादेशिक व २ आंतरराष्‍ट्रीय भाषा) आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये ग्राहकांसाठी प्रभावी वैयक्तिक सुविधा आहेत. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल (डीएटीसी) सह टच टाइप एसी कंट्रोल पॅनेल आणि अॅम्बिण्‍यट लायटिंग आहे, ज्‍यामधून सर्वांना आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळतो.

 

प्रीमियम ६ व ७ सीटर एसयूव्‍हीमध्‍ये सेगमेंटला नव्‍या उंचीवर घेऊन जाणारी आरामदायीपणा, सोयीसुविधा व सुरक्षितता वैशिष्‍ट्ये देखील आहेत, जसे रेन सेन्सिंग वायपर्स, बोस प्रीमियम साऊंड ८ स्‍पीकर सिस्‍टम, वॉईस एनेबल स्‍मार्ट पॅनोरॅमिक सनरूफ, पहिल्‍या व दुसऱ्या रांगेत वायरलेस चार्जर, मॅग्‍नेटिक पॅड आणि इतर अनेक.

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार इंटेलिजन्‍स, आरामदायीपणा व कार्यक्षमतेच्‍या एकत्रिकरणासह ड्रायव्हिंग अनुभवाला परिभाषित करण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍यामुळे ही लक्षवेधक ६ व ७ सीटर प्रीमियम एसयूव्‍ही आहे.

 

उत्‍साही कार्यक्षमता

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार तिच्‍या प्रखर, शक्तिशाली आणि फन-टू-ड्राइव्‍ह कार्यक्षमतेसह ग्राहकांना आनंदित करेल. प्रीमियम ६ व ७ सीटर एसयूव्‍हीमध्‍ये डायनॅमिक १.५ लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन आहे, जे ११७.५ केडब्‍ल्‍यू (१६० पीएस) अधिकतम शक्‍ती आणि २५३ एनएम (२५.८ kgm) अधिकतम टॉर्क देते. ६-स्‍पीड मॅन्‍युअल आणि ७-स्‍पीड डीसीटी ट्रान्‍समिशनमध्‍ये उपलब्‍ध असलेले हे इंजिन सर्वसमावेशक व उत्‍साही ड्राइव्‍हची खात्री देते.

 

विश्‍वसनीयता व इंधन कार्यक्षमतेला महत्त्व देणाऱ्यांसाठी १.५ लीटर यू२ सीआरडीआय डिझेल ६-स्‍पीड मॅन्‍यूअल व ६-स्‍पीड ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन्‍ससह इंजिन प्रभावी ८२ केडब्‍ल्‍यू (११६ पीएस) अधिकतम शक्‍ती आणि २५० एनएम (२५.५ kgm) अधिकतम टॉर्क देते. आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये विविध ड्राइव्‍ह मोड्स (नॉर्मल, इको व स्‍पोर्ट) व ट्रॅक्‍शन मोड्स (स्‍नो, मड व सँड), पॅडल शिफ्टर्स आणि इडल स्‍टॉप अँड गो (आयएसजी) वैशिष्‍ट्य देखील आहे. अल्‍काझारमधील प्रत्‍येक प्रवास संस्‍मरणीय साहसाचा अनुभव देतो आणि ही वैविध्‍यपूर्ण एसयूव्‍ही प्रत्‍येक सूक्ष्‍मदर्शी पसंतीची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे.

 

इंजिन

 

अधिकतम शक्‍ती

 

अधिकतम टॉर्क

 

ट्रान्‍समिशन

 

इंधन कार्यक्षमता

 

(एआरएआय चाचणी केलेले)

 

१.५ लिटर टूर्बो जीडीआय पेट्रोल

 

११७.५ केडब्‍ल्‍यू (१६० पीएस)

 

२५३ एनएम (२५.८ kgm)

 

६एमटी

 

१७.५ किमी/लिटर

 

७डीसीटी

 

(ड्युअल क्‍लच ट्रान्‍समिशन)

 

१८.० किमी/लिटर

 

१.५ लिटर यू२ सीआरडीआय डिझेल

 

८५ केडब्‍ल्‍यू (११६ पीएस)

 

२५० एनएम (२५.५ kgm)

 

६एमटी

 

२०.४ किमी/लिटर

 

६एटी

 

१८.१ किमी/लिटर

 

 

 

सुरक्षिततेची खात्री

 

सुरक्षिततेला अधिक प्राधान्‍य देत आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार अनेक प्रगत सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह प्रवाशांना अधिक सुरक्षिततेची खात्री देते. सर्व प्रवाशांना सुरक्षितता देत आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये ७० हून अधिक एकूण सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, तसेच बेस्ट-इन-सेगमेंट ह्युंदाई स्‍मार्टसेन्‍स लेव्‍हल २ एडीएएससह १९ पैलू आहेत, जसे स्‍मार्ट क्रूझ कंट्रोल, सराऊंड व्‍ह्यू मॉनिटर (एसव्‍हीएम), ब्‍लाइण्‍ट स्‍पॉट व्‍ह्यू मॉनिटर (बीव्‍हीएम), फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग व अव्‍हॉइडण्‍स असिस्‍ट, लेन कीपिंग असिस्‍ट, ड्रायव्‍हर अटेंशन वॉर्निंग आणि इतर अनेक. ही एसयूव्‍ही तिच्‍या ऑफरिंग्‍जसह वेईकलमधील सुरक्षिततेला नव्‍या उंचीवर घेऊन जाते.

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारच्‍या शक्तिशाली बॉडी रचनेमधून प्रगत उच्‍च क्षमतेचे स्‍टील व हॉट स्‍टॅम्पिंगचे व्‍यापक वापर, टिकाऊपणा व अपघातापासून सुरक्षितता वाढवण्‍यासाठी रचनात्‍मक सुधारणेसह प्रवाशांना शील्‍डसारख्‍या संरक्षणाची खात्री मिळते. या एसयूव्हीमध्‍ये प्रमाणित ४० सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत जसे सहा एअरबॅग्‍ज, हिल-स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रोल, वेईकल स्‍टेबिलिटी मॅनेजमेंट, चारही डिस्‍क ब्रेक्‍स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम (हायलाइन). तसेच, आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारमध्‍ये सुधारित सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत, जसे डिजिटल की, हिल डिसेंट कंट्रोल, फ्रण्‍ट पार्किंग सेन्‍सर्स, रेन सेन्सिंग वायपर्स, इलेक्‍ट्रो क्रोमिक इनसाइड रिअर व्‍ह्यू मिरर, जे सर्वसमावेशक सुरक्षितता देण्‍यासह सर्व प्रवाशांना मन:शांतीची खात्री देतात.

 

रंग

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार ९ आकर्षक रंगांसह ८ मोनो-टोन पर्यायांमध्‍ये ऑफर करण्‍यात येईल जसे नवीन रॉबस्‍ट एमराल्‍ड मॅट, टायटन ग्रे मॅट, रॉबस्‍ट एमराल्‍ड, स्‍टारी नाइट, रेंजर खाखी, फायरी रेड, अब्‍यास ब्‍लॅक, अॅटलास व्‍हाइट आणि १ ड्युअल-टोन कलर पर्याय ब्‍लॅक रूफसह अॅटलास व्‍हाइटमध्‍ये उपलब्‍ध असेल.

 

मन:शांती

 

आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार ग्राहकांना आनंदी जीवन व दर्जात्‍मक वेळेसाठी उच्‍च दर्जाची मन:शांती देते. ३ वर्षांची अनलिमिटेड अंतरापर्यंतची वॉरंटी आणि रोडसाइड असिस्‍टण्‍स (आरएसए) सह ग्राहक आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारच्‍या मालकीहक्‍क अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. ह्युंदाईचे ग्राहककेंद्रित डीएनए दाखवण्‍यासाठी आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार विश्‍वसनीय रनिंग रिपेअर पॅकेजचे जवळपास ५ वर्षांचे संरक्षण आणि ट्रस्‍ट सुपर पीरियोडिक मेन्‍टेनन्‍स पॅकेजच्‍या जवळपास ५ वर्षांच्‍या संरक्षणासह ऑफर करण्‍यात येईल. तसेच, ग्राहक परिपूर्ण मन:शांतीसाठी जवळपास ७ वर्षांच्‍या विस्‍तारित वॉरंटी पर्यायांचा आनंद घेऊ शकतात.

 

è आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझारचे इंटीरिअर व एक्‍स्‍टीरिअरमध्‍ये सानुकूल बदल करण्‍याकरिता ग्राहकांसाठी ४६ अॅक्‍सेसरीजची उत्‍साहवर्धक श्रेणी उपलब्‍ध आहे.

 

इंटेलिजण्‍ट, व्‍हर्साटाइल व इण्‍टेन्‍स आकर्षक नवीन ह्युंदाई अल्‍काझार:

 

आकर्षक डिझाइन

 

अद्विततीय आरामदायीपणा व सोयीसुविधा

 

प्रगतीशील तंत्रज्ञान

 

उत्‍साही कार्यक्षमता

 

सुरक्षिततेची खात्री

 

आकर्षक, उंच, मोठे स्‍टान्‍स

 

थाय कूशन एक्‍स्‍टेंशन (फर्स्‍ट इन सेगमेंट)

 

डिजिटल की (फर्स्‍ट-इन-एचएमआयएल):

 

जवळपास ३ युजर्सना (जवळपास ७ डिवाईसेसना) की शेअरिंग

 

१.५ लिटर टूर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन – अधिकतम शक्‍ती ११७.५ केडब्‍ल्‍यू (१६० पीएस), अधिकतम टॉर्क २५३ एनएम (२५.८ kg.m), ट्रान्‍समिशन ६एमटी/७डीसीटी

 

(बेस्‍ट इन सेगमेंट)

 

लेव्‍हल २ एडीएएससह १९ ह्युंदाई स्‍मार्टसेन्‍स™ वैशिष्‍ट्ये

 

नवीन क्रॅश पॅडसह ड्युअल टोन कलर: नोबल ब्राऊन व हेझ नेव्‍ही इंटीरिअर (नवीन)

 

दुसऱ्या रांगेत व्‍हेण्टिलेटेड सीट्स (नवीन)

 

दुसऱ्या रांगेत वायरलेस चार्जर (फर्स्‍ट इन सेगमेंट)

 

१.५ लिटर यू२ सीआरडीआय डि‍झेल इंजिन – अधिकतम शक्‍ती ८५ केडब्‍ल्‍यू (११६ पीएस), अधिकतम टॉर्क २५० एनएम (२५.५ kg.m), ट्रान्‍समिशन ६एमटी/६एटी

 

६ एअरबॅग्‍ज (सर्व व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये प्रमाणित)

 

कर्टन एअरबॅग

 

नवीन हूड, नवीन बम्‍पर, स्किड प्‍लेट व फ्रण्‍ट ग्रिल डिझाइन

 

दुसऱ्या रांगेत कॅप्‍टन सीट्ससह फोल्डिंग आर्मरेस्‍ट, तसेच सुधारित कूशनिंग व बॉल्‍स्‍टरिंग (नवीन)

 

रेन सेन्सिंग वायपर्स (नवीन)

 

ट्रॅक्‍शन कंट्रोल मोड्स: स्‍नो, सँड, मड

 

स्‍मार्ट क्रूझ कंट्रोल

 

अद्वितीय सिग्‍नेचर एच-शेप्‍ड एलईडी डीआरएल

 

ड्रायव्‍हर पॉवर सीट मेमरी फंक्‍शन (नवीन)

 

ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्‍लायमेट कंट्रोल (डीएटीसी) सह टच टाइप कंट्रोल पॅनेल (नवीन)

 

ड्राइव्‍ह मोड: इको, नॉर्मल, स्‍पोर्ट

 

सराऊंड व्‍ह्यू मॉनिटर

 

क्‍वॉड बीम एलईडी हेडलॅम्‍प

 

८-वे पॉवर ड्रायव्‍हर + पॉवर पॅसेंजर सीट (नवीन)

 

(बेस्‍ट इन सेगमेंट)

 

बोस प्रीमियम साऊंड ८ स्‍पीकार सिस्‍टमसह सेंट्रल स्‍पीकर व सब-वूफर

 

सुधारित इंधन कार्यक्षमतेसाठी आयएसजी

 

फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि अव्‍हॉइडण्‍स असिस्‍ट

 

१८ इंच डायमंड कट अलॉई व्‍हील्‍स

 

वॉक इन डिवाईस (पॅसेंजर सीट) (नवीन)

 

२६.०३ सेमी (१०.२५ इंच) मल्‍टी डिस्‍प्‍ले डिजिटल क्‍लस्‍टर आणि एचडी ऑडिओ व्हिडिओ नेव्हिगेशन सिस्‍टम

 

पॅडल शिफ्टर्स

 

ब्‍लाइण्‍ड स्‍पॉट व्‍ह्यू मॉनिटर

 

विनासयाय एकीकृत कर्व्हिलिनियर कनेक्‍टेड इन्‍फोटेन्‍मेंट व क्‍लस्‍टर (नवीन)

 

विंग टाइप हेडरेस्‍ट

 

ब्‍लूलिंक कनेक्‍टीव्‍हीटी (७० हून अधिक वैशिष्‍ट्ये)

 

 

 

लेन कीपिंग असिस्‍ट

 

ब्रिज टाइप रूफ रेल

 

लेदरेट सीट्ससह क्विल्‍टेड पॅटर्न

 

ऑन-बोर्ड नेव्हिगेशन

 

ड्रायव्‍हर अटेंशन वॉर्निंग

 

सीक्‍वेन्शियल टर्न इंडिकेटर (फ्रण्‍ट व रिअर) (नवीन)

 

 

 

बहुभाषिक यूआय डिस्‍प्‍ले (भारतात अद्वितीय) (१० प्रादेशिक व २ आंतरराष्‍ट्रीय भाषा)

 

हिल स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल

 

नवीन सिग्‍नेचर एच शेप्‍ड कनेक्‍टेड एलईडी टेललॅम्‍प्‍स

 

 

 

२७० हून अधिक एम्‍बेडेड व्‍हीआर वॉईस कमांड्स (हिंदी वॉईस कमांड्ससह)

 

हिल डिसेंट कंट्रोल

 

नवीन स्‍पॉयलर डिझाइनसह इंटीग्रेटेड स्‍टॉप लॅम्‍प

 

 

 

मॅग्‍नेटिक पॅड

 

इलेक्‍ट्रॉनिक स्‍टे‍बिलिटी कंट्रोल

 

नवीन बम्‍पर आणि स्किड प्‍लेट डिझाइन

 

सी टाइप यूएसबी चार्ज

र्स (तिन्‍ही रांगांमध्‍ये)

 

वेईकल स्‍टेबिलिटी मॅनेजमेंट

 

 

 

चारही डिस्‍क ब्रेक्‍स

 

फ्रण्‍ट सीटबेल्‍ट प्रीटेंशनर्ससह ड्रायव्‍हर अँकर प्रीटेंशनर

 

 

 

फ्रण्‍ट पार्किंग सेन्‍सर्स

 

रेन सेन्सिंग वायपर्स

 

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम (हायलाइन)

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments