*
पुणे, दि. १४: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी पुणे कॅन्टोन्मेंट (अ. जा.) विधानसभा मतदार संघातील सर्व २० उमेदवारांच्या निवडणूक विषयाच्या खर्चाची द्वितीय तपासणी खर्च निरीक्षक उमेश कुमार यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, तिसरा मजला बैठक सभागृह, सागर प्लाझा समोर येथे बुधवारी करण्यात आली.
यावेळी सहायक खर्च निरीक्षक विनोद शिंदे, मधुकांत प्रसाद व खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी कमलकिशोर राठी उपस्थित होते.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याकरीता विविध पथके तयार करण्यात आली असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च प्रमाणित करण्यात आला आहे. तपासणीवेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील दैनंदिन हिशोबांची नोंदवही व अभिलेखांसह उपस्थित होते. २० उमेदवारांपैकी २ उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळून आली.
उमेदवारांच्या खर्चाची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उमेदवारांच्या खर्चाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना उमेश कुमार यांनी दिल्या. यापुढील तिसरी खर्च तपासणी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता निवडणूक कार्यालयात होणार आहे,असे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी कळविले आहे.
000


