*
पुणे,दि.१४:- भारत निवडणुक आयोग कार्यालयाकडील निवडणुक खर्च संनियंत्रण संदर्भातील तरतूदीनुसार पिंपरी विधानसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची दुसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना आणि जिल्हा निवडणूक खर्च समन्वयक अश्विनी मुसळे यांच्या उपस्थितीत निगडी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ‘अ ’ क्षेत्रीय कार्यालय, दुसरा मजला, संत ज्ञानेश्वर चौक, निगडी प्राधिकरण येथे पार पडली. यावेळी निवडणूक खर्च तपासणी प्रमुख माधुरी बांदल आणि सहाय्यक खर्च निरीक्षक वर्मा व शिल्पा मंकणी, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
खर्च तपासणीवेळी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेल्या दिनांकापासून ते १३ नोव्हेंबर,२०२४ अखेरचा खर्चाचा तपशील सादर केला. ही तपासणी तीन टप्प्यात करण्यात येणार असून तिसरी तपासणी १९ नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली.
तिसऱ्या तपासणीसाठी विहित वेळेत खर्चाचा तपशील सादर करावा, अशी सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी सर्व उमेदवारांना केली आहे.
०००


