पुणे, दि. 14 : खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील ७५ ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ दिव्यांग अशा एकूण १२० मतदारांच्या गृहमतदानाची प्रक्रिया १५ व १६ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिली आहे.
गृह मतदानासाठी ६ पथकांची नियुक्ती केली असून प्रत्येक पथकात मतदानाधिकारी, इतर अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई, व्हिडिओग्राफर आणि सूक्ष्म निरीक्षक अशा सात कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून पोस्टल बॅलेटचे नोडल अधिकारी नितीन सूर्यवंशी हे आहेत. गृह मतदानासाठी नेमलेल्या पथकाचे प्रशिक्षण १२ नोव्हेंबर रोजी महात्मा गांधी विद्यालयात संपन्न झाले आहे.


