Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedDassault Systèmes तर्फे AAKRUTI या भारतातील एक जागतिक उत्पादन डिझाईन स्पर्धेच्या ...

Dassault Systèmes तर्फे AAKRUTI या भारतातील एक जागतिक उत्पादन डिझाईन स्पर्धेच्या १४ व्या सत्रातील विजेत्यांची घोषणा

AAKRUTI Global 2024 चा उद्देश युवा, उदयोन्मुख अभियंत्यांना Dassault Systèmes’ च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून त्यांच्या कल्पक, नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील अभियंता कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करणे हा होता

· स्पर्धा चार मुख्य शाश्वतता संकल्पनांवर केंद्रित होती: मानव कल्याणासाठी शाश्वत उत्पादने; हरित ऊर्जा निर्मिती, प्रसारण आणि साठवण; शाश्वत निवासस्थान / शहराची पायाभूत सुविधा; आणि शाश्वत गतिशीलता

· भारतभरातून आणि १० इतर देशांमधून ३३९ महाविद्यालयांमधील एकूण ८,००० स्पर्धकांनी AAKRUTI Global 2024 मध्ये भाग घेतला.

· विद्यार्थ्यांनी १०,००० अमेरिकन डॉलर पर्यंतची रोख बक्षिसे जिंकली.

Dassault Systèmes (Euronext Paris: FR0014003TT8, DSY.PA) ने आज AAKRUTI Global 2024 चे विजेते जाहीर केले. भारतातील ही एक आंतरराष्ट्रीय उत्पादन डिझाईन स्पर्धा असून त्यामध्ये अभियांत्रिकी, डिझाईन आणि तंत्रज्ञानाचे विद्यार्थी महत्वाच्या जागतिक समस्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले होते. या वर्षी या कार्यक्रमाने दक्षिण आफ्रिका, पोलंड, ग्रीस, इजिप्त, स्पेन, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलिपाईन्स आणि थायलंड या आणखी १० देशांमध्ये आपली पोहोच वाढवली आहे. पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून FORVIA Faurecia, इंडिया चे कंट्री जनरल मॅनेजर ओलिव्हियर चस्टॅंग उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून RuTAGe RSVC, इंडिया चे प्रोग्राम डायरेक्टर योगेश बिजलानी उपस्थित होते.

AAKRUTI Global 2024 ही एक तीन-स्तरीय डिझाईन आव्हान स्पर्धा होती. त्यामध्ये ३३९ जागतिक महाविद्यालयांमधून ८,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मानव कल्याण, शाश्वत शहरे, हरित ऊर्जा आणि शाश्वत गतिशीलता यामध्ये शाश्वत उपाय विकसित करण्यासाठी सहभागी विद्यार्थ्यांनी Dassault Systèmes’च्या 3DEXPERIENCE platform प्लॅटफॉर्मवर आभासी पद्धतीने काम केले. स्पर्धेने विद्यार्थ्यांना 3DEXPERIENCE प्लॅटफॉर्मसह, 3DEXPERIENCE Works, SOLIDWORKS आणि 3DEXCITE अ‍ॅप्लिकेशन्स असलेल्या अत्याधुनिक Dassault Systèmes तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी दिली.
AAKRUTI Global 2024 मध्ये शाश्वततेबाबत चार स्वतंत्र संकल्पना होत्या:

• मानव कल्याणासाठी शाश्वत उत्पादने: वास्तविक क्लिनिकल आवश्यकतांची पूर्तता करणारी, परवडणारी, ऊर्जा कार्यक्षम, वापरास सुलभ, अनुकूलनीय आणि कमी संसाधनांच्या वापरासह अधिक परिणाम साधता येतील अशी उत्पादने विकसित करणे. उत्पादनाचे डिझाईन अत्याधुनिक असले पाहिजे आणि रुग्ण, वैद्यकीय व्यावसायिक आणि वापरकर्त्यांसाठी महत्त्वपूर्ण लाभ मिळाले पाहिजेत.

• हरित ऊर्जा निर्मिती, प्रसारण आणि साठवण: प्रत्येकासाठी परवडणारी, विश्वासार्ह, पर्यावरणपूरक आणि समकालीन ऊर्जा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादने विकसित करणे. विद्यार्थ्यांना स्वच्छ ऊर्जा निर्मिती किंवा वापरासाठी एक उत्पादन विकसित करण्याची संधी आहे, ज्यामध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट असेल. डिझाईनमध्ये परवडण्याच्या आणि वापरण्यास सुलभतेच्या दृष्टीने प्राधान्य दिले पाहिजे.

• शाश्वत निवासस्थान / शहर पायाभूत सुविधा: घर बांधणीशी संबंधित खर्च कमी करण्यासाठी उत्पादने विकसित करणे. विद्यार्थ्यांना नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करत शहराच्या वाढीमध्ये योगदान देणारे उत्पादन तयार करण्याची संधी आहे.

• शाश्वत गतिशीलता: पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक समता आणि आर्थिक व्यवहार्यतेला प्राधान्य देणारी वाहतूक प्रणाली स्थापित करण्यासाठी उत्पादने विकसित करणे. त्यायोगे वाहतूक संसाधनांचा कार्यक्षम आणि शाश्वत वापर केला जाईल. विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक, इलेक्ट्रिक/हायब्रिड वाहने, कार-शेअरिंग/राईड-शेअरिंग सेवा आणि अत्याधुनिक वाहतूक प्रणालीसाठी उपाय विकसित करण्याची संधी आहे.

“नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी, वास्तविक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि एक शाश्वत भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी AAKRUTI सुसंगत आहे. हे तरुण मनांसाठी गतिशीलता, ऊर्जा आणि इतर अभियंता क्षेत्रांमध्ये त्यांची आवड शोधण्यासाठी, सहयोग साधण्यासाठी आणि त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी एक संधी आहे,” असे Dassault Systèmes चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक, दीपक एनजी म्हणाले. “अत्याधुनिक डिझाईन आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष अनुभवातून, सहभागी विद्यार्थ्याना अमूल्य माहिती आणि कौशल्ये मिळतात. ती त्यांना भविष्यातील कामासाठी तयार करतील.”

###

अधिक माहितीसाठी

Dassault Systèmes’ चा 3DEXPERIENCE प्लॅटफॉर्म, 3D डिजाईन सॉफ्टवेअर, 3D डिजिटल मॉक अप आणि Product Lifecycle Management (PLM) solutions (PLM) उपायसुविधा: http://www.3ds.com

हे सोशल प्लॅटफॉर्म X वर शेअर करा

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments