Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedआज सायंकाळी ६ पासून निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक...

आज सायंकाळी ६ पासून निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची मनाई*

*
ठाणे, दि. १८ (जिमाका): बुधवार, दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शांतता कालावधी आज सोमवार, १८ नोव्हेंबर,२०२४ रोजी सायं.६.०० वाजल्यापासून सुरू होत आहे. या दरम्यान विविध माध्यमांनी मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या, निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.
दृकश्राव्य माध्यमांनी (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडिया) अशा बातम्या प्रदर्शित करु नयेत. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
000000000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments