Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedअयोध्येत पुणेकरांचे भव्य सामूहिक रामरक्षा पठण आणि बालचमूंचे गीत रामायण ग्रंथ...

अयोध्येत पुणेकरांचे भव्य सामूहिक रामरक्षा पठण आणि बालचमूंचे गीत रामायण ग्रंथ पारायण दिंडी आणि चौफेर प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजन : २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी पठण

पुणे : राष्ट्र मंदिर पुनर्निर्माणासाठी, असुर,अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी, संघटित शक्तीच्या हुंकारासाठी, दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी, वसुंधरा व सर्व प्राणीमात्रांसह विश्व कल्याण असे ५ संकल्प करून पुण्यातील बालचमू भव्य रामरक्षा पठण आणि गीत रामायण सादरीकरण अयोध्या राम मंदिरात करणार आहेत. तब्बल १३ लक्ष रामरक्षा स्तोत्र पठण संकल्पपूर्ती २२ व २३ नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती ग्रंथ पारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे यांनी दिली.

कार्यक्रमात ८ ते १४ वयोगटातील बालकलाकार गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात हा गीतरामायणचा सादर करणार आहेत. पुण्यात घरोघरी आणि तुळशीबाग मंदिरात वर्षभर राम रक्षा पठण झाले होते.

दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता प्रथमच हिंदी व मराठी भाषेतून गीत रामायण सादरीकरण होणार आहे. दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता रामरक्षा पठण होणार आहे.

ओम धर्माधिकारी, निखिल दामले, आर्या संघवी, अरियाना नातू, राधा धर्माधिकारी, कौमुदी देशपांडे, दिव्या केळकर, गोजिरी चित्राव, श्रुती मायदेव, लास्यवी कोंडो, मिहिर चित्राव, अयान पत्की, वेद अकोलकर, आरुष खानझोडे, तनया खळदकर, देवश्री करमरकर, मुक्ता विधाते, जिया लोढा, स्पृहा जोशी, स्वरा मायदेव गायन करणार आहेत. सिद्धार्थ कुंभोजकर, मनोहर अत्रे, अदिती केसकर, आशिष केसकर वादन करणार आहेत.

चितळे बंधू मिठाईवाले, एम. व्ही. टिळे, शालगर होजिअरी, महालक्ष्मी सिल्क, डॉ. प्रशांत सुरु यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments