Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedएलसीसी प्रोजेक्ट्स लिमिटेडने आयपीओद्वारे भांडवली उभारणीसाठी सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

एलसीसी प्रोजेक्ट्स लिमिटेडने आयपीओद्वारे भांडवली उभारणीसाठी सेबीकडे दाखल केले डीआरएचपी

ईपीसी क्षेत्रातील कंपनी एलसीसी प्रोजेक्ट्स लिमिटेडने भांडवली बाजार नियंत्रक सेबीकडे प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (आयपीओ)साठी मंजुरी मिळविण्यासाठी Draft Red Herring Prospectus (डीआरएचपी) दाखल केले आहे.
प्रस्तावित आयपीओमध्ये ₹320 कोटींच्या नवीन इक्विटी समभागांची निर्मिती, तसेच प्रवर्तकांकडून 2.29 कोटी समभागांचा ऑफर-फॉर-सेल (OFS) समाविष्ट आहे, असे DRHP मध्ये नमूद करण्यात आले आहे.
एलसीसी प्रोजेक्ट्स लिमिटेडचे प्रवर्तक अर्जन सुजा रबारी आणि लालजीभाई अर्जनभाई अहीर आहेत.
आयपीओमधून मिळणाऱ्या नवीन निधीचा उपयोग उपकरणे खरेदी, कर्जाची परतफेड आणि सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी केला जाणार आहे.
एलसीसी प्रोजेक्ट्स लिमिटेड ही भारतातील आघाडीची ईपीसी (इंजिनीअरिंग, प्रोक्युरमेंट, कन्स्ट्रक्शन) कंपनी असून, ती प्रामुख्याने सिंचन आणि पाणीपुरवठा प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे.
गेल्या दोन दशकांमध्ये एलसीसी प्रोजेक्ट्स लिमिटेडने विविध प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. यामध्ये धरणे, बंधारे, जलसंधारण रचना, कालवे, पाइप वितरण प्रणाली, लिफ्ट सिंचन प्रकल्प, जलपुरवठा योजना आणि इतर EPC प्रकल्पांचा समावेश आहे.
या आयपीओसाठी मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजर्स यांची एकमेव मर्चंट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments