Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या 'लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्यूशन्स'ला ‘इंडिया डिझाईन मार्क अवॉर्ड २०२४’मध्ये...

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुप’च्या ‘लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्यूशन्स’ला ‘इंडिया डिझाईन मार्क अवॉर्ड २०२४’मध्ये मोठा सन्मान आठ नाविन्यपूर्ण उत्पादनांना डिझाईन उत्कृष्टतेसाठीची पारितोषिके

भारत, २५ फेब्रुवारी २०२५ : गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या ‘लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्यूशन्स’ या व्यवसाय विभागाला प्रतिष्ठित इंडिया डिझाईन मार्क अवॉर्ड २०२४ प्रदान करण्यात आले आहे. या सन्मानाने नवोन्मेष, उच्च दर्जाची कार्यक्षमता आणि अत्याधुनिक डिझाईन यांसाठीची कंपनीची कटिबद्धता अधोरेखित झाली आहे.

कंपनीच्या पारितोषिकप्राप्त उत्पादनांमध्ये होम डेकोर हँडल्स (एचडीएच ०१, एचडीएच ०२, एचडीएच ०३, एचडीएच ०६, एचडीएच ०७ आणि एचडीएच १०), तसेच स्लायडिंग दरवाजांसाठीचे वॉर्डरोब साइड लॉक आणि कॅटस हॉटेल इंटरकनेक्टेड लॉक यांचा समावेश आहे. आधुनिक भारतीय घरांच्या गरजा लक्षात घेऊन ही उत्पादने विकसित करण्यात आली असून, ती उत्कृष्ट उपयोगिता, टिकाऊपणा आणि सौंदर्यदृष्ट्या आकर्षक डिझाईन प्रदान करतात. ही उत्पादने उद्योगासाठी नवी मानके प्रस्थापित करीत आहेत आणि समकालीन जीवनशैलीत समाविष्ट होण्यास मदत करीत आहेत.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि लॉक्स व आर्किटेक्चरल सोल्यूशन्स या विभागाचे व्यवसाय प्रमुख श्याम मोटवानी म्हणाले, “नवकल्पना आणि डिझाईनची उत्कृष्टता या गोष्टी ‘लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्यूशन्स’च्या केंद्रस्थानी आहेत. आमच्या प्रत्येक उत्पादनात डिझाईन थिंकिंगचा अंतर्भाव केला जातो. त्यामुळे ही उत्पादने केवळ कार्यक्षमच नाहीत, तर आधुनिक आर्किटेक्चर आणि डिझाईन ट्रेंडशी सुसंगत असतात. सलग अनेक वर्षे प्रतिष्ठित इंडिया डिझाईन मार्क अवॉर्ड मिळणे हे आमच्या कामाच्या उच्च दर्जाचे प्रतीक आहे. भारतातील पहिले ‘मेड इन इंडिया’ आयओटी-९ डिजिटल लॉक सादर करण्यापासून ते आर्किटेक्चरल फिटिंग्ज व सिस्टीम्समध्ये नावीन्य आणण्यापर्यंत, आम्ही सुरक्षितता आणि डिझाईनच्या सीमा सतत पुढे नेत आहोत. आजचा हा सन्मान आमच्या उत्कृष्टतेसाठीच्या कटिबद्धतेची साक्ष देतो आणि आम्हाला आणखी पुढे जाण्यासाठी प्रेरित करतो. केवळ ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे आमचे उद्दिष्ट नाही, तर त्याहून अधिक उत्तम उपाय तयार करून घरे अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि स्टायलिश बनविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

घरगुती सुरक्षितता आणि आर्किटेक्चरल सोल्यूशन्समध्ये सातत्याने प्रगती करणारा ब्रँड म्हणून ‘लॉक्स आणि आर्किटेक्चरल सोल्यूशन्स’चा लौकिक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि वापरकर्त्याभिमुख डिझाईनचा अवलंब करत ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो कटिबद्ध आहे. ‘इंडिया डिझाईन मार्क अवॉर्ड २०२४’ हा या उत्कृष्टतेच्या सततच्या शोधाचा गौरव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments