Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedगृहविक्रीत पुणे अव्वल, प्रमुख शहरांना टाकले मागे क्रेडाई पुणे मेट्रो आणि...

गृहविक्रीत पुणे अव्वल, प्रमुख शहरांना टाकले मागे क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्सचा अहवाल

वर्ष २०२४ मध्ये ९०,००० घरांची विक्री करून पुणे आघाडीवर, वर्ष २०२० मधील विक्रीच्या तुलनेत ५६ टक्के वाढ
वर्ष २०२४ मध्ये घरांच्या विक्रीचे एकूण मूल्य ६५,००० कोटी रुपयांवर, वर्ष २०२३ मधील ५९,४८० कोटींच्या तुलनेत ९.२८ टक्के जास्त
पुण्यात घरांची सरासरी किंमत ७३ लाख रुपये, इतर प्रमुख महानगरांपेक्षा खूपच कमी
पुणे हे देशातील सर्वांत परवडणारे आणि सर्वाधिक गृहविक्री होणारे मेट्रो शहर, देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात वर्चस्व कायम

पुणे २७ फेब्रुवारी २०२५: वर्ष २०२४ मध्ये ९०,०००घरांच्या विक्री करून पुणे शहराने २०२१ पासून सलग चौथ्या वर्षी भारतातील रिअल इस्टेट विक्रीतील अव्वल शहर म्हणून आपले स्थान अबाधित राखले आहे. क्रेडाई पुणे मेट्रो आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी आज पुणे गृहनिर्माण अहवाल फेब्रुवारी २०२५ प्रसिद्ध केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे. या आकडेवारीने देशातील रिअल इस्टेट बाजारपेठेत पुण्याचे वर्चस्व अधोरेखित केले आहे.

या अहवालाचे कॅम्प येथील क्रेडाई पुणे मेट्रो कार्यालयातील रामकुमार राठी हॉलमध्ये क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, सीआरई मॅट्रिक्सचे सीईओ अभिषेक गुप्ता, जनसंपर्क संयोजक कपिल गांधी, व्यवस्थापन समिती सदस्य अभिषेक भटेवारा आणि पुनित ओसवाल, डेटा विश्लेषक राहुल अजमेरा आणि हिरेन परमार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला रिअल इस्टेट उद्योगातील १०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

अहवालातील प्रमुख मुद्दे:
भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील अव्वल बाजारपेठ : २०२४ मध्ये पुण्याने सुमारे ९०,००० घरांची विक्री करत देशात अव्वल स्थान कायम राखले. या घरांच्या विक्रीचे एकूण मूल्य ६५,००० कोटी रुपये असून, २०१९ मधील ३०,००० कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ११६ टक्क्यांपेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाली आहे.

पुण्यात, रिअल इस्टेट हा सर्वांत पसंतीचा गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास आला आहे, ५१ टक्के गुंतवणूकदार इक्विटी, सोने किंवा मुदत ठेवींसारख्या इतर मालमत्ता वर्गांपेक्षा रिअल इस्टेटला पसंती देतात.

परवडणाऱ्या किमतींमुळे वाढीला चालना : पुणे हे भारतातील सर्वांत परवडणारे मेट्रो शहर आहे, जे उद्योग आणि स्थलांतरितांनाही आकर्षित करते. येथे घराची सरासरी किंमत ७३ लाख रुपये आहे, त्यामुळे बंगळुरू ( १.३५ कोटी रु.) आणि हैदराबाद ( १.७५ कोटी रु.) सारख्या मेट्रो शहरांच्या तुलनेत हे सर्वांत परवडणारे शहर आहे. राजधानी शहर नसतानाही किंवा थेट बंदर कनेक्टिव्हिटी नसतानाही, पुणे घरांच्या विक्रीत आघाडीवर आहे. त्यामुळे निवासी केंद्र म्हणून त्याचे आकर्षण वाढले आहे. पुण्यात, स्वमालकीचे घर घेणे ही सर्वसामान्य आकांक्षा आहे, अनेक रहिवासी स्वतःची घरे खरेदी करू शकतात. याउलट, मुंबईसारख्या इतर महानगरांमध्ये, मालमत्तेच्या उच्च किमती अनेकदा लोकांना खरेदी करण्याऐवजी भाड्याने घेण्यास भाग पाडतात.

बाजारपेठेतील वेगवान वाढ: गेल्या पाच वर्षांत, पुण्याच्या निवासी बाजारपेठेने युनिट विक्रीच्या एकूण मूल्यात २२ टक्क्यांचा प्रभावी वार्षिक चक्रवाढ दर (CAGR) नोंदवला आहे.

खरेदीदारांच्या पसंतींमध्ये बदल: २०२४ मध्ये ७० लाखांपेक्षा कमी किमतीच्या घरांचा विक्रीत ६० टक्के हिस्सा होता, २०२० मध्ये तो ८५ टक्के होता. यावरून मोठ्या आणि अधिक प्रीमियम मालमत्तांकडे कल वाढल्याचे दिसून येते.

लक्झरी घरांच्या मागणीत वाढ : गेल्या पाच वर्षांत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांची विक्री ५ पट वाढली आहे, जी लक्झरी आणि प्रीमियम घरांची वाढती मागणी दर्शवते.

परवडणारी घरे: आता ४५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची परवडणारी घरे एकूण विक्रीत ३० टक्के योगदान देतात, २०२० मध्ये हे प्रमाण ५५ टक्के होते. यावरून या विभागात कमी पुरवठा दिसून येतो.

विक्रीतील भौगोलिक केंद्रीकरण: ७५ टक्क्यांपेक्षा जास्त घरांची विक्री तीन प्रमुख भागांमध्ये दिसून आली. पुणे वायव्य (हिंजवडी – महाळुंगेभोवती), पुणे ईशान्य (खराडी – वाघोलीच्या आसपास), आणि पुणे उत्तर (पिंपरी चिंचवडच्या आसपास).

लक्षणीय प्रादेशिक वाढ: पुणे नैऋत्य (कोथरूड-बावधन प्रदेश) मध्ये २०२० ते २०२४ या कालावधीत विक्री झालेल्या युनिट्सच्या सरासरी किमतीत उल्लेखनीय ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मूल्यवृद्धी: पुण्यातील घरांच्या सरासरी किमतीत गेल्या पाच वर्षांत ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फ्लॅटचे वाढलेले आकार आणि वाढते इनपुट खर्च यामुळे ही वाढ झाली आहे.

यावेळी राहुल अजमेरा यांनी ‘रिअल इस्टेट ट्रेंड्स अँड अॅनालिसिस’ या विषयावर सादरीकरण केले, तर वरिष्ठ निरीक्षकांनी सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात अजमेरा यांनी पुण्यातील नवीन प्रकल्प सुरू होणे आणि घरांचा पुरवठा जवळजवळ २५ टक्के कमी झाल्याचे अधोरेखित केले. याचे मुख्य कारण मंजुरींमध्ये होणारा विलंब, जमीन संपादनामधील आव्हाने आणि नियामक अडचणी असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे केवळ घर खरेदीदारांसाठी पर्याय मर्यादित होत नाहीत, तर चॅनेल पार्टनर्समध्येही स्पर्धा वाढली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले, “गेल्या पाच वर्षांत, आम्ही विक्रीच्या प्रमाणात ५६ टकक्यांनी वाढ पाहिली आहे, ज्यामुळे पुणे जिल्ह्याने भारतातील सर्वाधिक विक्री होणारा आणि सर्वाधिक प्राधान्य असलेला रिअल इस्टेट बाजारपेठ म्हणून आपले स्थान पक्के केले आहे. याव्यतिरिक्त, या काळात एकूण विक्री मूल्यही दुप्पट झाले आहे, ज्यामुळे सरकारी महसूलात लक्षणीय वाढ झाली आहे. घरांची सरासरी किंमत आता ७३ लाख रुपये आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आम्ही एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांमध्ये ५ पट वाढ पाहिली आहे. प्रीमियम अपार्टमेंटची ही वाढती मागणी पुणे शहर अधिक समृद्ध शहर बनण्याचे संकेत देते. ”

सीआरई मॅट्रिक्सचे सीईओ अभिषेक किरण गुप्ता म्हणाले, “क्रेडाई पुणे यांच्या सहकार्याने सीआरई मॅट्रिक्सने केलेल्या आणखी एका संशोधन अहवालाचे अनावरण करताना मला खूप आनंद होत आहे. एक कोटी ते दोन कोटी रुपये किमतीच्या घरांनी मूल्यात सर्वाधिक वाढ अनुभवली आहे, हे उत्साहवर्धकआहे. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते, की पुण्यातील घर खरेदीदार केवळ अधिक घरे खरेदी करत नाहीत तर मोठ्या, अधिक प्रशस्त मालमत्तादेखील निवडत आहेत.

हा पुणे गृहनिर्माण अहवाल अचूक आणि विश्वासार्ह माहिती सादर करतो, कारण सर्व डेटा आणि आकडेवारी नोंदणी आणि मुद्रांक विभाग व महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (महारेरा) यासह अधिकृत सरकारी संस्थांकडून थेट मिळवली जाते, असेही गुप्ता यांनी नमूद केले.

भविष्यातील दृष्टिकोन:

औद्योगिक वाढ आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह, पुण्याची रिअल इस्टेट बाजारपेठ शाश्वत विस्तारासाठी सज्ज आहे. प्रीमियम घरांची वाढती मागणी आणि वाढत्या स्थलांतरामुळे भारतातील सर्वांत गतिमान रिअल इस्टेट डेस्टिनेशन म्हणून पुण्याचे स्थान आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

About CREDAI-Pune Metro:

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments