Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’ (एसएसपीयू) तर्फे ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस...

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’ (एसएसपीयू) तर्फे ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’

भारतातील पहिले कौशल्य-आधारित विद्यापीठ असलेल्या ‘सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’ (एसएसपीयू) तर्फे ‘स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’ हा संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील उदयोगांत काम करण्यासाठी सज्ज, व्यावसायिक तयार करण्यासाठी एक विशेष उपक्रम सुरू केला आहे. एसएसपीयूच्या किवळे कॅम्पसमध्ये नुकत्याच आयोजित एका विशेष कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यावेळी संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल व्ही जी खंडारे, एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), एमसीसीआयएचे सदस्य हर्ष गुणे आणि एसएसपीयूच्या कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार उपस्थित होते.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ‘सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’ च्या कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या, “भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रांची झपाट्याने वाढ होत आहे, ज्यामुळे या उद्योगासाठी कुशल व्यावसायिकांची नितांत गरज निर्माण झाली आहे. डिफेन्स आणि एरोस्पेस क्षेत्राला स्वावलंबी बनविण्यामध्ये योगदान देण्यासाठी ‘एसएसपीयू स्कूल ऑफ डिफेन्स आणि एरोस्पेस टेक्नॉलॉजी’ विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, उद्योगात काम करण्याचा अनुभव आणि नेतृत्व कौशल्य प्रदान करेल.”

संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल व्ही जी खंडारे यांनी “कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल सिक्युरिटी सुरक्षा अँड पॉवर (राष्ट्रीय सुरक्षा आणि शक्ती)” या विषयावर मुख्य भाषण केले. हर्ष गुणे, सदस्य एमसीसीआयए, यांनी “कॅपसिटी बिल्डिंग इम्प्रॅटिव्ह ऑफ द आत्मनिर्भर भारत” (आत्मनिर्भर भारताच्या क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक गोष्टी) तर एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी ‘संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर माहिती दिली.

संरक्षण उत्पादन आणि एरोस्पेस इनोव्हेशनसाठी भारत एक जागतिक केंद्र म्हणून उदयास येत असताना, ‘एसएसपीयू स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी‘ उद्योगपती, धोरणकर्ते आणि संरक्षण संस्था यांच्या सहकार्याने डिझाइन केलेले विशेष अभ्यासक्रम प्रदान करेल. अभ्यासक्रमात संरक्षण उत्पादन, संरक्षण लॉजिस्टिक्स, एमआरओ (देखभाल आणि दुरुस्ती), सायबर युद्ध, संरक्षणातील एआय आणि अंतराळ सुरक्षा यावर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामुळे विद्यार्थी धोरणात्मक आणि तांत्रिक कौशल्य दोन्हीसह सुसज्ज होतील.या अभ्यासक्रमांची आखणी करण्यासाठी विद्यापीठाने एल अँड टी, गोदरेज, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, टाटा टेक्नॉलॉजीज मधील आघाडीच्या उद्योग तज्ञांशी संवाद साधला आहे.

‘एसएसपीयू स्कूल ऑफ डिफेन्सची अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी’ ची प्रमुख वैशिष्ट्ये:

एरोस्पेस आणि संरक्षण तज्ञांच्या अंतर्दृष्टी सह बनवलेला अभ्यासक्रम
अग्रगण्य संरक्षण आणि एव्हिएशन संस्थांसह इंटर्नशिप आणि थेट प्रोजेक्ट्स
कौशल्य विकासासाठी प्रगत सिम्युलेशन लॅब आणि उत्कृष्टता केंद्रे
संरक्षण आणि उद्योगातील दिग्गजांकडून लीडरशिप प्रशिक्षण
संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील संधींसाठी इच्छुकांसाठी प्लेसमेंट सहाय्य आणि करिअर मार्गदर्शन

डिफेन्स टेकमधील बी.टेक. च्या पहिल्या बॅचचे प्रवेश लवकरच सुरू होतील.

अधिक माहितीसाठी admissions@sspu.ac.in वर संपर्क साधा किंवा तुमचे स्वारस्य नोंदवण्यासाठी www.sspu.ac.in ला भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments