Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedद इंडियन गॅरेज कंपनीचा ॲमनोरा येथील फ्लॅगशिप स्टोअरसह महाराष्ट्रात विस्तार

द इंडियन गॅरेज कंपनीचा ॲमनोरा येथील फ्लॅगशिप स्टोअरसह महाराष्ट्रात विस्तार

पुणे,27 फेब्रुवारी 2025 : भारतातील आघाडीच्या फास्ट फॅशन डी2सी ब्रँडस पैकी एक असलेल्या द इंडियन गॅरेज कंपनी ने ॲमनोरा मॉल येथे 1 आणि 2 मार्च 2025 रोजी नवीन फ्लॅगशिप स्टोअरच्या उद्घाटनाची घोषणा केली आहे. या स्टोअरचे उद्घाटन ॲमनोरा मॉलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरजित सिंग राजपुरोहित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हैदराबाद येथील सारथ सिटी मॉल येथील ब्रँडच्या घवघवीत यशानंतर द इंडियन गॅरेज कंपनी फॅशन चाहते असलेल्या जेन-झी ग्राहकांपर्यंत ट्रेंडी कलेक्शन पोहचवत महाराष्ट्रात आपली छाप पाडण्यास सज्ज झाले आहे.

हा विस्तार साजरा करण्यासाठी ब्रँड तर्फे भारतातील सर्वांत मोठा फॅशन इव्हेंट म्हणजे फॅशन फ्रेंजी सेल हा पुण्यातील फॅशन चाहत्यांसाठी 48 तासांचा शॉपिंग महोत्सव आयोजित केला आहे. स्टोअरमधील प्रत्येक वस्तूची किंमत 799 रूपयांपेक्षा कमी असेल. यामध्ये 1500 पेक्षा अधिक स्टाईल्स,कोरियन प्रेरित व बोहेमियन कलेक्शनचा समावेश आहे.1 मार्च रोजी पहिल्या 100 प्रेक्षकांना रूपये 1000 पर्यंतच्या उत्पादनांची खरेदी मोफत मिळेल. हा रोमांचक सेल या हंगामातील व्हायरल फॅशन इव्हेंट बनेल,ज्यामध्ये विविध शैलींवर अतुलनीय डील्स मिळतील.

2051 चौरस फुटांवर विस्तारलेल्या ॲमनोरा मॉलमधील फ्लॅगशिप स्टोअर एक आकर्षक खरेदी अनुभव देईल. ज्यामुळे ग्राहकांना जेन-झी पिढीसाठी स्टाईलिश फॅशनचे विविध प्रकार उपलब्ध होतील. ट्रेंडी स्ट्रीट वेअर पासून ते रिसॉर्ट आणि बोहेमियन प्रेरित उत्पादनांपर्यंत हे स्टोअर पुण्यातील तरूण फॅशन जागरूक लोकांसाठी त्यांच्या विविध आवडी-निवडीनुसार डिझाईन केले गेले आहे.

द इंडियन गॅरेज कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत तांतेड म्हणाले की, पुण्यामध्ये द इंडियन गॅरेज कंपनीचे स्टोअर सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ॲमनोरामधील हे स्टोअर आमच्या विस्तार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि फॅशन जागरूक असलेल्या पुणेकरांपर्यंत आमचे स्टायलिश कलेक्शन आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.पुण्यातील गतिमान उर्जेमुळे या नवीन स्टोअरसाठी हे शहर योग्य ठिकाण आहे.

हैदराबादमधील सारथ सिटी मॉलमध्ये यशस्वी पदार्पणासह द इंडियन गॅरेज कंपनीने चांगली गती प्राप्त केली असून शैली,गुणवत्ता आणि नाविन्यपूर्णतेचे खास मिश्रण पुण्यात आणण्यासाठी सज्ज आहे. आजच्या अत्याधुनिक जागरूक ग्राहकांना अनुरूप असा एक अनोखा खरेदीअनुभव देण्यासाठी ब्रँड वचनबध्द आहे.

स्टोअर लाँच साजरे करण्यासाठी द इंडियन गॅरेज कंपनी विशेष इन स्टोअर कलेक्शन्स आणि उद्घाटनपर ऑफर्स देखील देत आहेत.1 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता दरवाजे उघडतील,ग्राहकांची रांग सकाळी 10 वाजल्यापासूनच सुरू होईल.त्यामुळे सर्वोत्तम डील आणि स्टाईलसाठी लवकर येण्याचे आवाहन केले जात आहे.

द इंडियन गॅरेज कंपनीच्या रिटेल विभागाच्या प्रमुख अल्का देंबला म्हणाल्या की,पुण्यातील स्टोअर हे शैली आणि अभिनवताचे मिश्रण असलेल्या खास खरेदी अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या वचनबध्दतेचे प्रतिबिंब आहे. आम्हाला आमच्या ग्राहकांना एक उत्साही वातावरणात नवीनतम फॅशन ट्रेंडस प्रदान करायचे आहेत. पुण्यातील फॅशन चाहत्यांना आमच्या नवीन फ्लॅगशिप स्टोअरमधील फास्ट फॅशनमधील सर्वोत्तम अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

पुण्यातील लॉंच हे द इंडियन गॅरेज कंपनीच्या रिटेल विस्तार धोरणाचा एक भाग असून बँगलोर,त्रिवेंद्रम आणि इतर शहरात यापुढे स्टोअर्स सुरू केले जातील. ब्रँडचे विकास धोरण हे देशभरात रिटेल नेटवर्क प्रस्थापित करण्याच्या ध्येयाच्या केंद्रस्थानी असून भारतातील अधिकधिक ग्राहकांपर्यंत ट्रेंडी फॅशन याद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. ब्रँडची उत्पादने TIGC.inया अधिकृत वेबसाईटद्वारे उपलब्ध आहे. तसेच मिंत्रा,आजिओ,ॲमेझॉन,फ्लिपकार्ट,स्नॅपडील आणि यु ए ई नून या प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर देखील उपलब्ध आहे. ब्रँडची भारतातील सुमारे 100 फॅशन फॅक्टरी स्टोअर्स मध्ये उपस्थित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments