Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedविद्यार्थ्यांमध्ये उद्योजक मानसिकता घडविणे गरजेचे लेम्मा टेक्नॉलॉजी कंपनीचे सीईओ गुलाब...

विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक मानसिकता घडविणे गरजेचे लेम्मा टेक्नॉलॉजी कंपनीचे सीईओ गुलाब पाटील यांचे मत : मएसो सिनियर कॉलेज, डिक्की (DICCI) नेक्स्ट जेन, लघुउद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ‘उद्यमी संवाद – ‘कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा’

पुणे : आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर कोणत्या ठिकाणी शिक्षण घेतले हे महत्त्वाचे नाही, तर उद्योजक मानसिकता गरजेची आहे. केवळ पगार आणि नोकरी यामध्ये समाधानी न राहता संशोधनात्मक वृत्ती विकसित करून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक मानसिकता घडविणे गरजेचे आहे, तरच आपल्या देशामध्ये अधिकाधिक उद्योजक निर्माण होतील. असे मत लेम्मा टेक्नॉलॉजीज कंपनीचे प्रमुख गुलाब पाटील यांनी व्यक्त केले.

मएसो सिनियर कॉलेजच्या आंत्रप्रेन्यूअर डेव्हलपमेंट सेल आणि डिक्की (DICCI) नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उद्यमी संवाद – ‘कथा उद्योगाची प्रवास उद्योजकाचा – भाग सहावा’ या विशेष मुलाखतपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. कोथरूड मधील मएसो सभागृहात हा कार्यक्रम झाला.

म ए सो नियामक मंडळाच्या उपाध्यक्षाआनंदी पाटील, मएसो सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ.पूनम रावत, सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. सुरेखा वैद्य, स्टार्टअप इनोव्हेशन सेल समन्वयक प्रा. निलेश यादव यावेळी उपस्थित होते. वैचारिक किडा चे प्रशांत दांडेकर यांनी गुलाब पाटील यांच्याशी मुलाखतपर संवाद साधला.

गुलाब पाटील म्हणाले, आउटडोर मार्केटिंग आणि डिजिटल जाहिरात या क्षेत्रामध्ये नावीन्यपूर्ण विचार आणि संशोधनात्मक कृतीमुळे या क्षेत्रामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे पोचता येईल हा विचार केला. त्यातून उद्योग निर्माण करून आज देशांमध्ये सुमारे ९५ टक्के या उद्योगातील क्षेत्र लेम्मा टेक्नॉलॉजीज ने व्यापलेले आहे. तंत्रज्ञानात सोबतच तुम्ही सर्वसामान्यांची भाषा आणि गरज ओळखली तर उद्योजक म्हणूनही तुमच्या उद्योगासाठी ती अतिशय फायद्याची ठरू शकते.

उद्यमी संवाद या कार्यक्रमानंतर गुलाब पाटील यांच्या हस्ते मएसो सीनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा, संशोधन, लेखन , क्रिडा – महाविद्यालयीन, आंतर महाविद्यालयीन स्पर्धा, तसेच शैक्षणिक व अभ्यासक्रम विषयक, विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धा, आविष्कार, राष्ट्रीय सेवा योजना, महाविद्यालयीन ग्रंथालय स्तरावरील विविध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, महाविद्यालयातील विविध क्लब अंतर्गत स्पर्धा अशा अनेक विभागांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव समारंभ २०२५ मध्ये गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments