Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedटीव्हीएस मोटर कंपनीतर्फे 3.1 kWh टीव्हीएस आयक्यूब व्हेरिएंट लाँच, सुधारित वैशिष्ट्ये आणि...

टीव्हीएस मोटर कंपनीतर्फे 3.1 kWh टीव्हीएस आयक्यूब व्हेरिएंट लाँच, सुधारित वैशिष्ट्ये आणि 123 किमी रेंज

टीव्हीएस आयक्यूबची विक्री ६,००,००० युनिट्सपुढे, भारतीय ईव्ही बाजारपेठेत आघाडीचे स्थान कायम

 

· नवीन 3.1 kWh व्हेरिएंटमध्ये आयडीसी- सर्टिफाइड, 123 किमी रेंज

 

· अधिक जास्त सुरक्षा आणि सुखद अनुभव, हिल होल्ड व रिफ्रेश्ड UI/UX

 

बेंगळुरू, २ जुलै २०२५ – टीव्हीएस मोटर कंपनीने आज त्यांच्या फ्लॅगशीप इलेक्ट्रिक स्कूटरचे नवे व्हेरिएंट, टीव्हीएस आयक्यूब लाँच केले आहे. 3.1 kWh बॅटरी असलेल्या या व्हेरिएंटमध्ये १२३ किमी आयडीसी रेंज, हिल होल्ड आणि ड्युएल टोन डिझाइन समाविष्ट करण्यात आले आहे. या नव्या वैशिष्ट्यांमुळे कंपनीच्या ईव्ही पोर्टफोलिओमध्ये सुधारित रेंजसह मोलाची भर पडली आहे. आता टीव्हीएस आयक्यूब पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सहा व्हेरिएंट्सचा समावेश झाला असून हा या क्षेत्रातील सर्वात मोठा आणि आकर्षक पोर्टफोलिओ ठरत आहे.

 

१९०० टचपॉइंट्सद्वारे कार्यरत राहात टीव्हीएस आयक्यूबने ६,००,००० युनिट्सची विक्री केली असून या गाडीला भारतीय कुटुंबांच्या सर्वात आवडत्या ईव्हीचे स्थान मिळत आहे. त्याचप्रमाणे टीव्हीएस आयक्यूब हरित वाहतुकीच्या दिशेने भारताच्या स्थित्यंतराला चालना देत आहे. रोजच्या प्रवासासाठी खास डिझाइन करण्यात आलेली टीव्हीएस आयक्यूब 3.1 kWh ची एक्स शोरूम किंमत रू. १,०३,७२७ (दिल्ली) आहे आणि एका चार्जमध्ये ती १२३ किमीची आयडीसी सर्टिफाइड रेंज देते. या गाडीमध्ये अतिरिक्त सुरक्षेसाठी हिल होल्ड आणि जास्त इंट्युटिव्ह रायडिंगसाठी रिफ्रेश्ड UI/UX इंटरफेज देण्यात आला आहे. ही गाडी चार आकर्षक रंगात – पर्ल व्हाइट, टायटॅनियम ग्रे आणि दोन ड्युएल पर्याय – स्टारलाइट ब्लू विथ बेज व कॉपर ब्राँझ विथ बेज, उपलब्ध करण्यात आली आहे.

 

नवीन व्हेरिएंट टीव्हीएस आयक्यूबच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओसह पूर्णपणे सुसंगत असून हा पोर्टफोलिओ सुधारित बॅटरी क्षमता, रेंज क्षमता आणि ड्युएल टोन कलर्स व बॅकरेस्टसारख्या डिझाइन अपग्रेडसह नुकताच अद्ययावत करण्यात आला होता.

 

टीव्हीएस आयक्यूब तीन प्रमुख तत्वांवर आधारित आहे – ग्राहकांना रेंज, कनेक्टेड तंत्रज्ञान, चार्जिंग सोल्यूश्स व किंमतीच्या बाबतीत पॉवर ऑफ चॉइस देणेवाहन सुरक्षा व ओनरशीपचा एकंदर अनुभव यासह कम्प्लीट अश्युरन्स आणि वापरण्यास सोप्या व रायडिंगचा अनुभव उंचावणारे सिम्प्लिसिटी ऑफ युसेज.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments