Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedड्रम टाओने टोयोटाद्वारे आयोजित करण्‍यात आलेल्‍या उत्‍साहवर्धक इव्‍हेण्‍टमध्‍ये पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले

ड्रम टाओने टोयोटाद्वारे आयोजित करण्‍यात आलेल्‍या उत्‍साहवर्धक इव्‍हेण्‍टमध्‍ये पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले

ड्रम टाओची १४ दिवसांची टूर भारत व जपान यांच्‍यामधील दृढ सांस्‍कृतिक संबंध आणि दीर्घकालीन मैत्रीला प्रशंसित करते

पुणे, डिसेंबर १४, २०२५: टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम) आणि ड्रम टाओने पुणेकरांना उत्‍साह व संगीतमय मनोरंजनाचा संस्‍मरणीय अनुभव दिला. कोहिमामधील हॉर्नबिल म्‍युझिक फेस्टिवल, वाराणसीमधील नमो घाट येथे उत्‍साहवर्धक सादरीकरण आणि चेन्‍नई, बेंगळुरू, दिल्‍ली, मुंबई, जयपूर व कोलकाता येथे शोज सादर केल्‍यानंतर जपानमधील जागतिक स्‍तरावरील प्रतिष्ठित म्‍युझिक ग्रुपने लक्षवेधक लाइव्‍ह शोसह भारतातील आपला दौरा सुरू ठेवला, जेथे महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक राजधानीमध्‍ये संस्‍मरणीय सादरीकरण सादर केले.

हे सादरीकरण ड्रम टाओच्‍या भारताच्‍या १४ शहरांतील दौऱ्यामधील आणखी एक महत्त्वपूर्ण टप्‍पा ठरले, जेथे भारत व जपान यांच्‍यामधील कलात्‍मक सहयोग आणि दीर्घकालीन सांस्‍कृतिक संबंधांना प्रशंसित करण्‍याचा मनसुबा आहे. प्रबळ टायको ड्रमिंग, उत्तम समन्‍वय आणि मंचावर आकर्षक सादरीकरणासाठी प्रसिद्ध या ग्रुपने XX हून अधिक उत्‍साही व्‍यक्‍तींचे लक्ष वेधून घेतले, जेथे उपस्थित प्रेक्षकांनी उत्‍साहवर्धक साऊंड आणि रोमहर्षक सादरीकरणाने भरलेल्‍या संध्‍याकार्यक्रमाचा मनसोक्‍त आनंद घेतला.

प्रत्‍येक तालासह रोमांचक समापनाकडे वाटचाल करत या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्‍ध केले. शोमध्‍ये ड्रम टाओची कौशल्‍ये आणि मंचावरील उत्तम सादरीकरणाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

पुण्‍यामध्‍ये यशस्‍वी कॉन्‍सर्टनंतर ड्रम टाओ भारतातील आपला दौरा सुरू ठेवेल, जेथे पुढील सादरीकरण १९ डिसेंबर रोजी पोर्ट ब्‍लेअर येथे आयोजित करण्‍यात आले आहे, तसेच अंतिम सादरीकरण बेंगळुरूमध्‍ये २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्‍यात आले आहे.

१९९३ मध्‍ये जपानमधील ओइटा येथे स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या ड्रम टाओने जगभरातील १० दशलक्षहून अधिक प्रेक्षकांना मनोरंजनाचा आनंद दिला आहे. टोयोटाच्‍या ग्रुपसोबत सहयोगामधून ब्रँडचे ‘मोबिलिटी फॉर ऑल’ तत्त्व दिसून येते, जे प्रत्‍यक्ष कृतीच्‍या पुढे जात संकल्‍पना, सर्जनशीलता आणि सांस्‍कृतिक संबंधांना चालना देते. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून टीकेएम जपान व भारत यांच्‍यामधील सांस्‍कृतिक संबंध अधिक प्रबळ करत आहे, तसेच भारतातील तरूण प्रेक्षकांना उत्तम सादरीकरणाची प्रशंसा करण्‍यास आणि सहभाग घेण्‍यास प्रेरित करत आहे.

प्रेक्षक अपडेट्स, पडद्यामागील क्षण आणि निवडक सार्वजनिक इव्‍हेण्‍ट्सकरिता तिकिट माहितीसाठी टोयोटा किर्लोस्‍कर मोटरची वेबसाइट आणि सोशल मीडिया चॅनेल्‍सना फॉलो करू शकतात: https://www.toyotabharat.com/dru

mtao/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments