Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedजगात भारतीय संस्कृतीच टिकून आहे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात स्वामी...

जगात भारतीय संस्कृतीच टिकून आहे श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे विचारः विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार २०२४’

पुणे, दि. ५ मार्च : “जगात केवळ भारतीय संस्कृती आज ही टिकून आहे. जगातील एकूण ४८ पैकी ४७ संस्कृती काळानुसार नष्ट झाल्या आहेत. भारतीय संस्कृतीत ज्ञान, अध्यात्म आणि परंपरेचा समावेश आहे. त्यामुळेच ५ शतकानंतर अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झाली आहे. आझादीच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरचे २५ वर्ष देशाच्या उत्थानाचा काळ असणार आहे.” असे विचार रामजन्मभूमी तीर्थस्थळ निर्माण समितीचे कोषाध्यक्ष पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, औंध यांच्या वतीने अध्यात्मिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीकांत पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना ‘श्री स्वामी समर्थ औंध पुरस्कार २०२४’ या पुरस्काराने स्वामी गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते मानपत्र, शाल आणि पुणेरी पगडी घालुन सत्कार करण्यात आला.
स्वामी गोविंद गिरी महाराज म्हणाले,” माणुसकी रहित शिक्षण असेल तर ते क्लेषाचे कारण बनते. त्यामुळेच शिक्षणातून अध्यात्माकडे नेण्याचे साहस डॉ. विश्वनाथ कराड यांनी दाखविले आहे. त्यांनी माणुस बनविणार्‍या विश्वविद्यालयाची स्थापन केली आहे. शिक्षण व अध्यात्म क्षेत्रात केलेले कार्य पाहता येणारा काळ डॉ. कराड यांना कधिही विसरू शकणार नाही.”
“वर्तमानकाळात संतांचा आदर वाढतांना दिसत आहे. या सृष्टीवर स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महराज, गुलाबराव महाराज सारख्या संतांमुळे देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. आता हा देश झेप घेण्यास सिद्ध झाला आहे.”
डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” जो समाजाचे कल्याण करतो त्याला संत असे संबोधले जाते तर जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो त्याला स्वामी असे म्हटले जाते. आज संतानी आणि स्वामींनी भारतीय संस्कृती व परंपरा टिकवून ठेवली आहे. आळंदी ही ज्ञानाची भूमी असून येथूनच संपूर्ण जगाचे कल्याण होईल. तसेच, स्वामी विवेकानंदांच्या भाकितानुसार २१ व्या शतकात भारत माता ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येणार आहे. ”
अ‍ॅड. श्रीकांत पाटील यांनी प्रस्तावना मांडली. संग्राम मुरकुटे यांनी स्वामी आराधनेची माहिती दिली. तसेच, अनुराधा जोशी यांनी पाहुण्यांचा परिचय व स्वागतपर भाषण केले.
गंधाली भिडे यांनी सूत्रसंचालन केले. नानाजी चोंधे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments