Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedजुन्या निवासी इमारतींची किचकट पुनर्विकास प्रक्रिया आता एआयच्या मदतीने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून...

जुन्या निवासी इमारतींची किचकट पुनर्विकास प्रक्रिया आता एआयच्या मदतीने व्हॉट्सॲपच्या माध्यमातून होणार सोपी

रीडेव्हलपमेंट गुरु’च्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायटी सदस्यांना पुनर्विकासाबाबत मोफत, विश्वसनीयआणि सरकारी स्रोताधारित माहिती मिळणार

 

पुणे, दि. ०२ सप्टेंबर२०२६: गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत सदस्य आणि विकासक यांच्यातील माहितीची दरी भरून काढण्यासाठी पुणेस्थित ड्रीम्स रीडेव्हलप्ड, या पुनर्विकास सल्लागार संस्थेने ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ ही व्हॉट्सॲपवर आधारितसहाय्यक सेवा सुरु केली आहे. पुनर्विकासासंदर्भातील प्रश्नांची जलद आणि सरकारी स्रोतांवर आधारित उत्तरे सोसायटीच्या सदस्यांना मिळावीत, तसेच उपलब्ध माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता यावा, हा उपक्रमाचा उद्देश असल्याचे ड्रीम्स रीडेव्हलप्डचेसंस्थापक एस. लक्ष्मीनारायणन (सीए) यांनी आज झालेल्या एका पत्रकार परिषदेत जाहीर केले.

 

पुण्यातील स्वतःच्या गृहनिर्माण सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत अध्यक्ष म्हणून काम करताना संस्थेचे संस्थापक CA एस. लक्ष्मीनारायणन यांना याउ पक्रमाची कल्पना सुचली. एकदा सोसायटीतील एकासदस्याने त्यांना असा प्रश्न विचारला, ज्याचे तत्काळ उत्तर त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. या अनुभवातून सदस्यांना पुनर्विकासाशी संबंधित विश्वसनीय माहिती सहज उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित झाली.

 

“गृहनिर्माण सोसायटीसाठी पुनर्विकासाचा निर्णय हा अनेकदा आयुष्यात एकदाच घेतला जाणारा निर्णय असतो; मात्र विकसक दररोज अशाप्र कल्पांशी संबंधित काम करीत असतात. कायदेशीर, आर्थिक, वास्तुशास्त्रीय आणि नियामक बाबींची स्पष्ट माहिती मिळाल्यानंतरच सदस्यांना योग्य निर्णय घेता येतो. विश्वसनीय आणि पडताळतायेणारी माहिती सोप्या व सहज उपलब्ध माध्यमातून थेट सोसायटी सदस्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे ‘रीडेव्हलपमेंटगुरु’आहे,” असे CA एस. लक्ष्मीनारायणन, संस्थापक, ड्रीम्सरीडेव्हलप्ड यांनी सांगितले.

 

व्यवसायाने सनदी लेखपाल (चार्टर्डअकाउंटंट) असलेले लक्ष्मीनारायणन यांनी हैदराबाद येथील सुप्रसिद्ध इंडियन स्कूल ऑफबिझनेस (ISB),येथून एमबीए केलेअसून, भारतातीलशेअरबाजार (NSE) आणि वीजविनिमय क्षेत्रात त्यांनी आठ वर्षांहून अधिक काळकाम केलेआहे.

 

‘‘रीडेव्हलपमेंट गुरु’ची रचना विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि असे सभासद ज्यांच्या आयुष्यभराच्या मालमत्तेतील मोठा हिस्सा येथील घरामध्ये गुंतवलला गेला आहे, अशा सदस्यांचा विचार करून करण्यात आली आहे. सदस्य पुनर्विकासासंदर्भातील प्रश्न थेट व्हॉट्सॲपवर विचारू शकतात. त्यांना महारेरा नोंदी, नोंदणी व मुद्रांक विभाग (आयजीआर) मधील मालकी हक्काचा इतिहास तसेच संबंधित नियमावली यांसारख्या पडताळता येणाऱ्या स्रोतांशी जोडलेली उत्तरे मिळतील. विकसक, सोसायटी समिती तसेच वास्तुविशारद, कायदे विषयक व पुनर्विकास तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करताना कोणते प्रश्न विचारावेत, याबाबत ही वर नमूद व्हॉट्सॲपवर आधारित सेवा मार्गदर्शन करते.

 

सोसायटीतील मोठ्या संख्येने सदस्य, विशेषतः ज्येष्ठनागरिक, आधीपासून वापरत असलेल्या व्हॉट्सॲपवरच ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेचा वापर करण्यासाठी सदस्यांनी 9699653592 या व्हॉट्सॲप क्रमांकावर ‘Guru’ असा संदेश पाठवून पुनर्विकासाशी संबंधित प्रश्न विचारायचा आहे. सध्या प्रश्नांची उत्तरे देण्याची ही सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

‘रीडेव्हलपमेंट गुरु’चा उद्देश कागदोपत्री प्रक्रिया अधिक जलद करण्याचे आश्वासन देणे नसून, योग्य माहितीआणि स्पष्टता अधिक वेगाने उपलब्ध करून देणे, हा असल्याचे ड्रीम्स रीडेव्हलप्डचे संस्थापक लाक्ष्मिनारायानन यांनी सांगितले. बाईठका आणि चर्चांपूर्वी सदस्यांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध झाल्यास ऐकीव किंवा अपुऱ्या माहितीवरील अवलंबित्व कमी होऊन पुनर्विकास प्रक्रियेत सोसायट्यांना अधिक आत्मविश्वासाने सहभागी होता येईल, असा मत त्यांनी व्यक्त केले.

 

२०२०मध्ये CA एस. लक्ष्मीनारायणन यांनी स्थापन केलेल्या ड्रीम्स रीडेव्हलप्डने आतापर्यंत ४०० हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांसोबत काम केलेअसून १२५ व्यवहार्यता अहवाल, पूर्ण केले आहेत. यापैकी २४ प्रकल्पांचे बांधकाम सुरु झाले आहे. संस्थेच्या नेटवर्कमध्ये सध्या ११२ विकसक आणि वास्तुविशारद, कायदेविषयक तज्ज्ञ तसेच पुनर्विकासक्षेत्रातील तज्ज्ञांसह ४० हून अधिक संलग्न सल्लागारांचा समावेश आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात संस्थेचे कामकाज सुरू आहे.

 

व्यवहार्यता अहवाल, विशेष सर्वसाधारण सभा कागदपत्रांची तपासणी, कराराची तपासणी आणि विकासकाची पडताळणी यांसारख्या सशुल्क सेवांचे मॉड्यूल विकसित करण्यात येत आहे. सुरुवातीला ‘रीडेव्हलपमेंट गुरु’ आणि संबंधित सेवा महाराष्ट्रभर विस्तारण्याची ड्रीम्सरीडेव्हलप्डची योजना आहे. सशुल्क सेवांसाठी वेब ॲप्लिकेशन आणि त्यानंतर स्वतंत्र मोबाइल ॲप्लिकेशन सुरू करण्याचे नियोजन आहे.

 

पुनर्विकासासंदर्भातील प्रश्नांसाठी व्हॉट्सॲ पवर ‘Guru’ लिहा

 

व्हॉट्सॲप क्रमांक : 9699653592

 

ड्रीम्स रीडेव्हलप्ड विषयी

 

पुणे स्थित ड्रीम्स रीडेव्हलप्डन ही २०२० मध्ये स्थापन झालेली पुनर्विकास सल्लागार संस्था आहे. भारतीय गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत सोसायटी आणि विकासक यांच्यातील माहितीची दरी कमी करण्यासाठी संस्था कार्यरत आहे. महारेरा आणि आयजीआर नोंदींच्या आधारे व्यवहार्यता तपासणी, विकसकाची पडताळणी, कराराची तपासणी आणि विशेष सर्व साधारण सभेच्या तयारीसह विविध सल्लागार सेवा संस्था पुरवते. ‘रीडेव्हलपमेंट गुरु’या व्हॉट्सॲप सहाय्यकाच्या माध्यमातून हीच माहिती थेट सोसायटीच्या वैयक्तिक सदस्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

 

मराठवाडा मित्रमंडळ, टाटाटे क्नॉलॉजीज व सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्या वतीने सुरुक रण्यात आलेल्या एफएमसीआयआयआयउ पक्रमांतर्गत ड्रीम्स रीडेव्हलप्ड इन्क्युबेट झालेली स्टार्टअप असून हे स्टार्ट-अप तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासाची प्रक्रिया अधिक सुलभ, अधिक सुव्यवस्थित आणि कार्यक्षम

करण्यासाठी कार्यरत आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments