Wednesday, October 28, 2026
Google search engine
HomeUncategorized*'द चेम्बर्स आणि सीएस न्यायविधी एडीआर फोरम' मधून सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ*...

*’द चेम्बर्स आणि सीएस न्यायविधी एडीआर फोरम’ मधून सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ* पद्मभूषण ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते उद्घाटन ; गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन व न्यायालयातील कार्यवाही करीता विशेष सहकार्य

 

 

पुणे : सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ व्हावी, गरजू आणि गरीबांसाठी कायदेशीर परिसंस्था एकाच छताखाली विनामूल्य उपलब्ध व्हावी आणि ग्रामीण भागातून आलेल्या नवोदित वकिलांना व्यासपीठ मिळावे, याउद्देशाने कसबा पेठेत ॲड. चंद्रशेखर घाटे यांच्या पुढाकाराने केंद्राचे लोकार्पण झाले. त्यामुळे ‘द चेम्बर्स आणि सीएस न्यायविधी एडीआर फोरम’ मधून सामान्यांसाठी न्यायव्यवस्था आता अधिक सुलभ होणार आहे.

 

कसबा पेठेतील पवळे चौकात असलेल्या या केंद्राचे उदघाटन पद्मभूषण खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल माजी अध्यक्ष ॲड. हर्षद निंबाळकर, सदस्य ॲड. राजेंद्र उमाप, ॲड.विकास ढगे पाटील, ॲड.मिलिंद पवार, संयोजक ॲड. चंद्रशेखर नंदू घाटे आदी उपस्थित होते.

 

कायदेविषयक क्षेत्रात व्यावसायिक कार्यपद्धती, परस्पर समन्वय आणि प्रभावी सेवा यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कायदे क्षेत्रातील व्यावसायिक जबाबदारी, प्रामाणिकपणा, शिस्त आणि न्यायप्रक्रियेतील कर्तव्यनिष्ठा यांचे महत्त्व याद्वारे सर्वाना मिळेल, असे ॲड. उज्ज्वल निकम यांनी यावेळी सांगितले.

 

ॲड. चंद्रशेखर घाटे म्हणाले, या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कायदेविषयक क्षेत्रात नवनवीन उपक्रमांना चालना मिळेल, तसेच व्यावसायिक कार्यपद्धती आणि प्रभावी कायदेविषयक सेवांच्या विकासाला हातभार लागेल. विशेषतः कायदेविषयक सल्ला केंद्रात गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन व न्यायालयातील पुढील कार्यवाही करीता देखील विशेष सहकार्य करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन ॲड. चंद्रशेखर घाटे अँड असोसिएट्स यांनी केले. ॲड. हर्षद निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. मंगेश खराबे यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments