गुरुग्राम | ४ नोव्हेंबर २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) आणि कलेक्टिव्ह आर्टिस्ट्स नेटवर्कचा भाग असलेल्या टेरिबली टायनी टेल्स (टीटीटी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाली चोरी हो गई!’ ही पहिली दिवाळी विशेष मायक्रो ड्रामा सीरिज सादर करण्यात आली आहे.सहा भागांच्या या डिजिटल कथामालिकेत विनोद, रहस्य आणि भावनांचे मिश्रण असून, दिवाळीचा खरा आनंद अधोरेखित करण्यात आला आहे. कुटुंबाच्या परंपरा, एकत्रितपणे साजरे केले जाणारे सण-उत्सव आणि मौल्यवान आठवणी यांमुळे दिवाळीचा सण खऱ्या अर्थाने विशेष ठरतो, हे या मालिकेतून सादर करण्यात आले आहे. सण-उत्सवातील अर्थपूर्ण क्षण आणि एकत्रित अनुभव कशा प्रकारे पिढ्यांना एकमेकांच्या अधिक जवळ आणतात, हे या सीरिजमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया तर्फे ‘टेरिबली टायनी टेल्स’च्या सहकार्याने दिवाळी विशेष मायक्रो ड्रामा मालिका सादर
RELATED ARTICLES


