*
गुरु. दि. २७/०२/२०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा व साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारवाडा व लाल महाल येथे शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान व महाराष्ट्र गीत गायले. विद्यार्थी विविध संत,राष्ट्रपुरुष, समाज सुधारक, शिवाजी महाराज, झाशीची राणी, संत ज्ञानेश्वर, क्रांतिकारक तसेच थोर मराठी साहित्यिक यांच्या वेशभूषेत आले होते.
तसेच शाळेतही मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सरस्वतीपूजन व वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मा. मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच मातृभूमी व मातृभाषेचा अभिमान बाळगा. लेखन, वाचनाने स्वतःला समृद्ध करा असा संदेश दिला. इ.३री व ४ थी च्या विद्यार्थ्यांनी काही मराठी कवितांचे सादरीकरण केले. मीनल कचरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. योगिता भावकर यांनी मराठी भाषा गौरव दिनाची माहिती सांगितली. शाला समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास धनंजय तळपे, प्रतिभा पाखरे,स्वाती यादव यांनी आयोजनास सहाय्य केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नवीन मराठी शाळा व साईनाथ मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार वाड्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गायले मराठी अभिमान व महाराष्ट्र गीत*
RELATED ARTICLES


