Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे भव्य...

छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातून मानवंदना शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे भव्य रक्तदान मानवंदनेचे आयोजन ; १०० स्वराज्यघराण्यांचा आणि महाराष्ट्रातील शिवशंभू भक्तांचा सहभाग

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६ व्या बलिदान दिनी रक्तदानातून मानवंदना देण्यात आली. मानवंदनेचे हे सलग १२ वे वर्ष आहे. यावेळी जिजाऊ माँसाहेब शहाजी महाराज शिवज्योत रथाच्या नेतृत्वाखाली शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या तब्बल १०० स्वराज्यघराण्यांच्या वंशजांनी, ढोलताशा पथकांनी, क्रिडा संघटनांनी, गणेशोत्सव मंडळांनी रक्तदान मानवंदनेत सहभाग नोंदवला.

शुभारंभ लॅान्स, म्हात्रे पूल डीपीरोड येथे मानवंदनेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी रक्तदान मानवंदनेचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, मंगेश शिळीमकर, प्रवीणभय्या गायकवाड, रिंकल अमित गायकवाड तसेच स्वराज्यघराण्यांचे प्रतिनीधी उपस्थित होते.

रक्तदान मानवंदनेची सुरुवात ईशान अमित गायकवाड, सचिन पायगुडे, महेंद्र भोईटे, अविनाश कडू, राजेश जोगदंड, सुनील जोगदंड, दादा भोसले, मंदार मते, बाजीराव निगडे, ऋषीकेश पासलकर यांनी रक्तदान करुन केली. यावेळी रक्तदात्यांचा संकल्प पुर्ण झाला. हिंजवडी रक्तपेढीने रक्त संकलन केले.

अमित गायकवाड म्हणाले, स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन ११ मार्च हा दिवस “महामृत्युंजय रक्दान दिन” म्हणुन महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अणि त्यादविशी संपुर्ण महाराष्ट्रात रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी. ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा थेंबनथेंब अर्पण केला स्वराज्याच रक्षण करण्यासाठी, भारतभूमीच रक्षण करण्यासाठी, भारताच्या गौरवशाली संस्कृतीच रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातुन मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्ताने फेडूया, रक्ताचे रक्ताशी नाते जोडूयात ही जाणीव जपत आम्ही सलग १२ वर्षे रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत आणि भविष्यात राज्यव्यापी मानवंदनचे आयोजन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments