पुणे, दि. २८: चांदणी चौकातून कोथरूड कडे जाणारी एसटी बसेस व खाजगी ट्रॅव्हल्स बसेस यांना बंदी करण्यात आली असून कोथरूड कडे येण्यासाठी चांदणी चौक, डुक्कर खिंड, वारजे जंक्शन, आंबेडकर चौक, वनदेवी चौक व पुणेकर रोड पौडफाटा मार्गे स्थळे जावे.
वृंदावन हाऊसिंग कॉम्प्लेक्स गेट नंबर दोन च्या दोन्ही बाजूस दहा मीटर दरम्यान नो पार्किंग झोन करण्यात येत आहे. याबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला नंबर ६, एअरपोर्ट रोड, पुणे यांच्या कार्यालयात ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे आवाहन पोलीस उप आयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
०००००


